28 April 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल
x

PPF Scheme | तुमच्या मुलांच्या नावे पीपीएफ खातं उघडा आणि त्याच्या 19 व्या वर्षी 1 कोटी परतावा घ्या, आयुष्य बदलणारी बचत योजना

Highlights:

  • PPF Scheme
  • पीपीएफ गुंतवणूक
  • कमाल गुंतवणूक रक्कम मर्यादा
  • योजनेचा परिपक्वता कालावधी
  • मुलासाठी जमा करा कोटींचा निधी
PPF Scheme

PPF Scheme | प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, आपले कुटुंब आर्थिक रित्या समृद्ध आणि खुशाल व्हावे. यासाठी लोक आपल्या तुटपुंज्या पगारातून बचत करतात. बचत करण्यामागे ही रक्कम कठीण काळात कुटुंबाच्या उपयोगी पडेल, असा लोकांचा हेतू असतो. बचत करताना लोक आपल्या मुलांच्या उत्तम शिक्षणाची आणि चांगल्या भविष्याची योजना आखतात.

जर तुम्हालाही तुमच्या मुलासाठी चांगला फंड तयार करायचा असेल तर तुम्हाला बचत केलेली रक्कम PPF योजनेत गुंतवली पाहिजे. असे केल्याने तुमचा मुलगा 18 वर्षी लक्षाधीश होऊ शकतो. तुम्हाला बचत केली रक्कम अधिक वाढवायची असेल तर तुम्ही ती रक्कम बँकेत जमा न ठेवता PPF योजनेत लावली पाहिजे.

पीपीएफ गुंतवणूक :
PPF योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते किंवा PPF खात्याबद्दल नक्की ऐकले असणारच. बहुतेक पगारदार व्यक्ती PPF खात्यात गुंतवणूक करतात. या योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल रक्कम मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलत लाभ देखील मिळतो.

इतके कमालीचे फायदे असूनही लोक PPF खात्यात गुंतवणूक न करता एफडी मध्ये पैसे लावतात. त्यांना माहीत ही नसते की ते आपल्या मुलांच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने वार्षिक कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकता.

कमाल गुंतवणूक रक्कम मर्यादा :
आपल्याला सर्वांना माहीतच असेल की, PPF खात्यात गुंतवणूक करण्याची कमाल गुंतवणूक रक्कम मर्यादा 1.5 लाख रुपयेपर्यंत आहे. एका आर्थिक वर्षात तुम्ही एका PPF खात्यात 1.5 लाख रुपये रक्कम जमा करू शकता. तुम्ही गुंतवलेल्या 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत तुम्हाला कर सवलत मिळेल. कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत आपल्या मुलांच्या नावाने पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक करू शकतो.

योजनेचा परिपक्वता कालावधी :
सुरक्षित आणि हमखास परतावा कमावण्यासाठी पीपीएफ योजना खाते नेहमी उत्तम गुंतवणूक पर्याय मानला जातो. पीपीएफ खात्याबद्दल खास गोष्ट म्हणजे याचा लॉकइन कालावधी 15 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. PPF खात्यात गुंतवणूक सुरू केल्यास तुम्ही 15 वर्षांच्या आत पैसे कधी शकणार नाही.

मुलासाठी जमा करा कोटींचा निधी :
समजा तुमच्या मुलाचे वय आता 2 वर्ष आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर PPF खाते उघडून गुंतवणूक सुरू केल्यास पुढील 15 कालावधीत तुम्ही एक चांगली रक्कम जमा करू शकता. तुमचे मूल 17 वर्षांचे होईपर्यंत तुम्ही दरमहा 12500 रुपये जमा केले तर तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 26 लाख रुपये होईल. या हिशोबाने तुमचे मूल 19 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला 54.3 लाख रुपये परतावा मिळेल. जर तुम्ही पीएफ खात्यात दरमहा 25000 रुपये गुंतवणूक केली तर तुमचे मूल 19 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला १.१ कोटी रुपये परतावा मिळेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Scheme for Long term investment on behalf of Children for making huge fund on 28 May 2023.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x