5 May 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
x

Penny Stock | मजबूत परतावा देणारा 28 रुपयांचा हा शेअर खरेदीसाठी खूप स्वस्तात उपलब्ध होणार, कारण काय पहा

Penny stock

Penny Stock | श्री सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजन करण्यास मंजुरी दिली आहे. श्री सिक्युरिटीज लिमिटेड ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून कंपनीचे बाजार भांडवल 219.05 कोटी रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स आज 28.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. श्री सिक्युरिटीज लिमिटेड कंपनी मुखतहा वित्तीय सेवा क्षेत्रात नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून सेवा प्रदान करते. या कंपनीची नोंदणी कोलकाता येथील भारतीय रिझर्व्ह बँक कार्यालयात नॉन-बँकिंग वित्तीय संस्था म्हणून झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shree Securities Share Price | Shree Securities Stock Price | BSE 538975)

कंपनीचे स्टॉक स्प्लिट बाबत स्पष्टीकरण :
श्री सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 1:10 या प्रमाणत स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आज स्टॉक एक्स्चेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, ” कंपनीच्या संचालक मंडळाने 19 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या बैठकीत सेबी विनियम 2015 च्या शेड्यूल 2 च्या नियमन 30 अंतर्गत आपले विद्यमान शेअर्स विभाजित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे”. या निर्णयांसह ” कंपनीने बीएसई फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, स्टॉक स्प्लिट करण्याचा तर्क म्हणजे शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीचे इक्विटी शेअर्स अधिक परवडणारे वाटावे, आणि त्यांच्या सहभागाला अधिक प्रोत्साहन देता यावे, आणि शेअर बाजारात कंपनीच्या इक्विटी शेअर्सला प्रोत्साहन देऊन तरलता वाढावी यासाठी कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री सिक्युरिटीज शेअर्स
श्री सिक्युरिटीज लिमिटेड या कंपनीचे शेअर्स आज बीएसई निर्देशांकावर 28.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. स्टॉक मागील 26.15 रुपये बंदच्या तुलनेत 5 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 23 टक्क्यांनी वर गेली आहे. वार्षिक आधारावर शेअरची किंमत 17 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. या कंपनीच्या स्टॉकने 06/12/2022 रोजी 34.05 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 01/11/2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यावरून असे कळते की, हा स्टॉक मागील 1 वर्षाच्या उच्चांक किंमत पातळीच्या 19.38 टक्के खाली आणि 1 वर्षाच्या नीचांक किंमत पातळीच्या 62.42 टक्के वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny stock of Shree Securities Share Price after stock Split decision in Board of directors meeting on 20 December 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x