5 May 2024 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! या मल्टीबॅगर शेअरने 3 महिन्यांत 800% परतावा दिला, गुंतवणुकदार मालामाल, खरेदी करावा?

Multibagger stock

Multibagger Stock | 2022 या वर्षात शेअर बाजारात अद्भूत चढ उतार पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात अस्थरिता असूनही,एका कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना आश्चर्यकारक परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीबद्दल माहिती देणार आहोत, ज्याचा IPO काही महिन्यांपूर्वी लिस्ट झाला होता आणि अल्पावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे नशीब पालटून टाकले आहेत. आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, “Rhetan TMT”. या कंपनीच्या स्टॉकने लिस्टिंगनंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्या शेअर धारकांना 800 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543590)

Rhetan TMT शेअरची किंमत :
आज दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 451 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2022 मध्येच Rhetan TMT कंपनीचा IPO बीएसइ SME इंडेक्स वर सूचीबद्ध करण्यात आला होता. या कंपनीचा IPO 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत प्रति शेअर 70 रुपये निश्चित करण्यात आली होती. 5 सप्टेंबर 2022 रोजी ही कंपनी भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाली होती. लिस्टिंग च्या वेळी या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदाराना मोठ्या प्रमाणात निराश केले होते. स्टॉक लिस्ट झाल्यावर त्यात तेजी आली आणि, शेअरची किंमत त्याच्या IPO किंमतीच्या जवळ पोहोचली होती. सध्या स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. 13 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीच्या स्टॉकने 50 रुपये ही आपली नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती.

गुंतवणुकीवर परतावा :
सप्टेंबर 2022 या महिन्याच्या शेवटी Rhetan TMT च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली होती. तेव्हापासून स्टॉकने मागे वळून पाहिलेच नाही. शेअरने 50.60 रुपये नीचांक स्पर्श केल्यावर 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 455 रुपयांचा टप्पा गाठला आहे. म्हणजेच मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना नीचांक किंमत पातळीवरून 800 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्यामुळे 70 रुपयांचा IPO स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 551 टक्क्यांची मजबूत नफा कमवून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्केपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 968 कोटी रुपये आहे. जर तुम्ही 50.60 रुपये किमतीवर Rhetan TMT कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 9 लाख रुपये झाले असते.

कंपनीची कमाई आणि नफा :
Rhetan TMT कंपनीची स्थापना 1984 मध्ये झाली होती. ही कंपनी मुख्यतः TMT बार आणि राउंड बारची निर्मिती करते. कंपनीचा उत्पादन केंद्र गुजरातमध्ये आहे. जर आपण या कंपनीच्या तिमाही आर्थिक निकालांचे निरीक्षण केले ते आपल्याला समजेल की, 2020-21 मध्ये या कंपनीने 52.13 कोटी रुपये महसूल कमावला होता, ज्यावर कंपनीला 13.44 लाख रुपये नफा मिळाला होता. परंतु 2021-22 मध्ये कंपनीने 67.03 लाख रुपये महसूल संकलित केला होता, ज्यावर कंपनीने 2.34 कोटी रुपये नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Rhetan TMT Company share Price in focus on return check details on 21 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x