1 May 2024 4:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Quick Money Shares | पैसा झाला मोठा! अवघ्या 18 दिवसात या शेअरने 269% परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?

Quick Money Share

Quick Money Shares | मागील काही काळापासून एका साखर कंपनीचे शेअर्स धमाकेदार कामगिरी करत आहेत. या ही कंपनीचे नाव आहे, SBEC शुगर. ही साखर उत्पादन करणारी कंपनी मोदी उद्योग समूहाचा एक भाग आहे. एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सने मागील 18 दिवसांत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या साखर कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 25 रुपयांवरून 90 रुपयांवर पोहचले आहेत. मागील आठवड्यात हा स्टॉक 90 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर किमतीवर ट्रेड करत होता. मंगळवार 27 डिसेंबर 2022 रोजी एसबीईसी शुगर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर 85.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 21.05 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)

18 दिवसात दिला 269 % परतावा :
SBEC शुगर कंपनीच्या शेअर्सनी मागील 18 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या शेअर धारकांना 269 टक्के परतावा कमावून दिला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/ BSE इंडेक्सवर 1 डिसेंबर 2022 रोजी SBEC कंपनीचे शेअर्स 24.35 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 26 डिसेंबर 2022 रोजी SBEC शुगर कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 90.05 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉक मध्ये 5 टक्के लोअर सर्किट लागला असून शेअर 85.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. स्टॉक मध्ये आज प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. जर तुम्ही 1 डिसेंबर 2022 रोजी एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.69 लाख रुपये झाले असते.

2022 मध्ये दिला 286 टक्के परतावा :
SBEC शुगर कंपनीच्या शेअर्सनी 2022 या वर्षात आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 286 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी SBEC शुगर कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्समध्ये 23.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. SBEC शुगर कंपनीचा शेअर 26 डिसेंबर 2022 रोजी 90.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज हा स्टॉक 85.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षभरात या साखर कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 298 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 429 कोटी रुपये आहे.

3 वर्षांत दिला 2300 टक्के परतावा :
SBEC शुगर कंपनीच्या शहरास मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 2300 टक्के परतावा कमावून दिला आहे. 8 एप्रिल 2020 रोजी SBEC शुगर कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 26 डिसेंबर 2022 रोजी SBEC शुगर कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 90.05 वर बंद झाले होते, मात्र आज स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. नुकतेच सेबीने कंपनीकडून शेअर्समधील वाढीबाबत माहिती मागवली होती, मात्र एसबीईसी शुगर कंपनीने आपल्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही अशी माहिती दिली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Share of SBEC Sugar Share Price zoomed in short time check details on 27 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x