17 May 2024 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Paytm Share Price | होय! पेटीएम शेअर 75% स्वस्त मिळतोय, शेअरची किंमत पुढे अफाट वाढेल, तज्ज्ञांनी काय म्हटलं पहा

Paytm Share Price

Paytm Share Price | गोल्डमन सॅक्स फिनटेक कंपनीने पेटीएम कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पेटीएम कंपनी मार्च 2023 पर्यंत समायोजित EBITDA वर नफ्यात येईल असे गोल्डमन सॅक्स फर्मने म्हटले आहे. तज्ञांनी पेटीएमची मूळ कंपनी ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ ची लक्ष्य किंमत 1,100 रुपयांवरून 1,120 रुपये निश्चित केली आहे. बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 1.41 टक्के वाढीसह 533.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक आतापर्यंत आपल्या IPO किंमतीपासून 75 टक्के खाली आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)

पेटीएम कंपनीचा IPO नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 2150 रुपये निश्चित केली होती. गमतीची गोष्ट अशी की या कंपनीच्या शेअर्सने अद्याप आपली IPO किंमत स्पर्श केली नाही. हा आयपीओ आल्यापासून स्टॉकमध्ये घसरण सुरू आहे. पेटीएम कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 75 टक्के कमजोर झाले आहेत. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,147.40 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 439.60 रुपये आहे.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
नुकताच चीनच्या अलीबाबा ग्रुपने पेटीएम कंपनीमधील आपले 3.1 टक्के भाग भांडवल ब्लॉक डीलमध्ये विकले. यानंतर वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली. पेटीएम कंपनीचा स्टॉक कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या स्टॉकमध्ये सर्वात आघाडीवर आहे. तथापि स्टॉक मार्केट तज्ञ स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. अनेक तज्ज्ञ स्टॉक खरेदीची शिफारस करतात. पेटीएम स्टॉकवर 11 पैकी 8 तज्ञांनी ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ट्रेंडलाइन डेटानुसार हा स्टॉक सुमारे 66 टक्के वर जाऊ शकतो, असे तज्ञांना वाटते. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, या फिनटेक कंपनीला FY23 साठी रुपे डेबिट कार्ड आणि छोटे BHIM-UPI व्यवहार यांच्या जाहिरातीसाठी 2600 कोटी रुपयांच्या UPT प्रमोशन योजनेचा फायदा होऊ शकतो.

गोल्डमन सॅक्सचे पेटीएम बाबत मत :
Goldman Sachs ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पेटीएम कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत खूप कमी झाली आहे. Goldman Sachs ने म्हंटले आहे की, पेटीएम कंपनीचे मूल्यांकन अनेक स्पर्धक कंपनीच्या शेअरच्या तुलनेत सवलतीत मिळत आहे. Goldman Sachs फर्मला अपेक्षा आहे की, पेटीएम कंपनीचा EBITDA मार्जिन मार्च 2023 तिमाहीपर्यंत नफ्यात येइल. आणि कंपनीच्या महसुलातही सुधारणा होऊ शकते. कंपनीचे कर्ज वितरण आणखी वाढतील आणि शेअरची किंमत वाढले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price 543396 in focus check details on 18 January 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x