26 April 2024 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Gland Pharma Share Price | या शेअरची किंमत 50 टक्क्याने कमी झाली, स्वस्त झालेला स्टॉक खरेदीचा सल्ला, कारण काय?

Gland Pharma Share Price

Gland Pharma Share Price | शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के घसरणीसह 1387 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी या कंपनीने फार्मा क्षेत्रातील सर्वात IPO शेअर बाजारात लाँच केला होता. या कंपनीचा IPO इश्यू 13 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. कंपनीने IPO साठी शेअरची इश्यूची किंमत 1500 रुपये निश्चित केली होती. आणि शेअर लिस्टिंगच्या दिवशी 1701 रुपयेवर सूचीबद्ध झाला होता. IPO शेअर्स प्राप्त झालेल्या गुंतवणुकदारांना 201 रुपये नफा मिळाला होता. कंपनीने IPO द्वारे 6500 कोटी रुपये भांडवल उभारण्याचे लक्ष निश्चित केले होते. सध्या मात्र शेअरची किंमत IPO इश्यूच्या तुलनेत कमी झाली आहे. इतकेच नाही तर शेअर 4316.25 रुपये या आपल्या सर्वोच्च किंमत पातळीपासून एक तृतीयांशपेक्षा अधिक पडले आहेत. शेअरची किंमत सध्या आपल्या नीचांक किंमत पातळीच्या जवळ आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Gland Pharma Share Price | Gland Pharma Stock Price | BSE 543245 | NSE GLAND)

13 ऑगस्ट 2021 रोजी ग्लँड फार्मा कंपनीचा IPO शर बाजारात सूचीबद्ध झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत शेअरची किंमत एक तृतीयांश कमी झाली आहे. 20 नोव्हेंबर 2020 रोजी पर्यंत शेअरची किंमत आपल्या IPO इश्यू किमतीच्या 23 टक्के खाली आली होती. 13 ऑगस्ट 2021 रोजी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता कमी होऊन 33 हजार झाले असते.

2023 या नवीन वर्षात शेअरची किंमत 11 टक्क्यांहून अधिक कमजोर झाली आहे. आहे . त्याच वेळी मागील 5 दिवसांत शेअरची किंमत 6 टक्क्यानी खाली आली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचा 42.77 टक्के नुकसान केला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 62 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3698.20 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1387.15 रुपये होती.

खरेदी, विक्री, होल्ड? :
ग्लँड फार्मा कंपनीची मागील काही महिन्यांची कामगिरी पाहता 17 पैकी 4 तज्ञांनी शेअर्स तत्काळ विकून बाहेर पडण्याची शिफारस केली आहे. 12 तज्ञांनी स्टॉकमध्ये तेजीचा अंदाज वर्तवला आहे. तर यापैकी 7 जणांनी स्टॉकमध्ये स्ट्रॉग बाय करण्याचा सल्ला दिला आहे. 5 तज्ञ Buy On Dip ची शिफारस करत आहेत. आणि फक्त एक तज्ञ स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gland Pharma Share Price 543245 stock market live on 20 January 2023.

हॅशटॅग्स

Gland Pharma Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x