26 April 2024 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Sundaram Clayton Share Price | 1180% डिव्हीडंड देणारा धमाकेदार शेअर, गुंतवणूकदार मालामाल होतं आहेत, रेकॉर्ड डेट पहा

Sundaram Clayton Share Price

Sundaram Clayton Share Price | TVS उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘सुंदरम क्लेटन लिमिटेड’ कंपनीने डिसेंबर 2022 या तीमहीच्या निकलासोबत लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 31 मार्च 2023 मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1180 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 59 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sundaram Clayton Share Price | Sundaram Clayton Stock Price | BSE 520056 | NSE SUNCLAYLTD)

लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख :
सुंदरम क्लेटन कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहिती म्हटले आहे की, ” बुधवारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र शेअर धारकांना 5 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 59 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी हा अंतरिम लाभांश 10 फेब्रुवारी 2023 रोजी किंवा नंतर शेअर धारकांच्या खात्यात जमा करेल. लाभांश वाटपासाठी 3 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे.

डिसेंबर तिमाहीत कंपनीची कमाई :
सुंदरम क्लेटन लिमिटेड कंपनी डिसेंबर 2022 या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 8,475.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एक वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 6915.62 कोटी रुपये नफा कमावला होता. मागील एका वर्षात कंपनीच्या महसुलात 23.55 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी डिसेंबर 2021 या तिमाहीत कंपनीने 123.83 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर डिसेंबर 2022 या तिमाहीत कंपनीने 127.32 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. म्हणजेच वर्षानुवर्ष कंपनीच्या नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे. NSE इंडेक्सवर 30 जानेवारी 2023 रोजी सुंदरम क्लेटन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.66 टक्क्यांच्या वाढीसह 4,730 रुपयांवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sundaram Clayton Share Price 520056 SUNCLAYLTD stock market live on 30 January 2023.

हॅशटॅग्स

Sundaram Clayton Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x