5 May 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार
x

IRCTC Share Price | आयआरसीटीसी शेअर तेजीत, रेटिंग वाढवली, तज्ज्ञांकडून स्टॉकसाठी नवीन टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा

IRCTC Share Price

IRCTC Share Price | ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ म्हणजेच ‘आयआरसीटीसी’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात वाढू शकतात, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. आयआरसीटीसी ही कंपनी मुख्यतः रेल्वे तिकीट बुकिंग व्यवसायाशी संबंधित आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत 256 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मजबूत तिमाही निकालानंतर शेअर बाजारातील तज्ज्ञ आयआरसीटीसी स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स बेस बिल्डिंग मोडमधून बाहेर पडतील आणि लवकरच 750 रुपयांच्या पार जातील. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 644.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRCTC Share Price | IRCTC Stock Price | Indian Railway Catering & Tourism Corporation Share Price | Indian Railway Catering & Tourism Corporation Stock Price | BSE 542830 | NSE IRCTC)

तज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला :
आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी म्हंटले आहे की, आयआरसीटीसी कंपनीच्या शेअर्सने दैनंदिन चार्ट पॅटर्नवर डबल बॉटम पॅटर्नची निर्मिती केली आहे, जे द्विमार्गी व्यापार दर्शवते. गुंतवणुकदारांनी या कंपनीचे शेअर्स 605 रुपये स्टॉप लॉस लावून पडत्या किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील एक ते दोन महिन्यात या कंपनीचे शेअर्स 690 रुपये किंमत पातळी सहज ओलांडून जाईल असे तज्ञ म्हणाले. त्याच वेळी आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स मध्यम ते दीर्घ मुदतीमध्ये 720 ते 750 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात.

आयआरसीटीसी स्टॉकबाबत सल्ला :
चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी म्हंटले आहे की, आयआरसीटीसी कंपनीच्या शेअरला 630-635 रुपये किंमत पातळीवर जबरदस्त सपोर्ट आहे. बाउन्स बॅकवर शेअरची किंमत 680 रुपये पर्यंत वाढू शकते. त्याच वेळी 680 रुपयांची किंमत पातळी ओलांडल्यानंतर शेअर्स 710 रुपये किंमत स्पर्श करतील असे तज्ञ म्हणाले. ब्रोकरेज हाऊस प्रभुदास लिल्लाधरचे वरिष्ठ विश्लेषक सल्ला देतात की, गुंतवणूकदारांनी आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स होल्ड करून ठेवावे. ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ ने आर्थिक वर्ष 2022-23 या वर्षात प्रति शेअर 3.50 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRCTC Share Price 542830 stock market live on 11 February 2023.

हॅशटॅग्स

#IRCTC Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x