19 May 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

SBI Amrit Kalash FD Scheme | एसबीआय बँकेची विशेष FD स्कीम, मिळेल मजबूत व्याज, सर्व फायदे जाणून घ्या

SBI Amrit Kalash FD Scheme

SBI Amrit Kalash FD Scheme | देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय’ने पुन्हा एकदा ‘अमृत कलश’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज दिले जातेय. बँकेने ही विशेष एफडी योजना 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केली. कारण ही 31 मार्च 2023 पर्यंतच सुरु राहणार होती. मात्र आता ही तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही 400 दिवसांची FD आहे. अमृत ​​कलश डिपॉझिटमध्ये प्रीमेच्योर आणि लोन सुविधा देखील उपलब्ध आहे. येथे आम्ही तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहोत. तसेच त्याचे सर्व फायदे समजून घ्या.

कालावधी ४०० दिवसांचा
एसबीआयने नुकतेच आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे, ज्यानुसार घरगुती (देशातील) आणि एनआरआय ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदर, 400 दिवसांचा कालावधी आणि इतर अनेक फायद्यांसह अमृत कलश ठेव योजना सादर करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी अटी व शर्तीही लागू आहेत आहेत असे म्हटले आहे.

एसबीआय अमृत कलश डिपॉझिटचा व्याजदर किती आहे?
एसबीआय अमृत कलश डिपॉझिट योजनेचा व्याजदर वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळा आहे. नियमित नागरिकांसाठी व्याजदर ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के आहे. त्याचप्रमाणे एसबीआय पेन्शनर आणि कर्मचाऱ्यांसाठी व्याजदर 1 टक्के अतिरिक्त ठेवण्यात आला आहे. या ठेव योजनेचा एकूण कालावधी ४०० दिवसांचा आहे.

विशेष खाते उघडावे लागेल
एसबीआय अमृत कलश डिपॉझिट योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांना आपला निधी किमान ४०० दिवस जमा ठेवावा लागेल. एसबीआय अमृत कलश डिपॉझिट योजनेचा कालावधी 12 ​​एप्रिल 2023 ते 30 जून 2023 पर्यंत असेल. 30 जून 2023 पर्यंत तुम्ही केव्हाही अर्ज करू शकता. एसबीआय अमृत कलश डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला एसबीआय अमृत कलश खाते उघडावे लागेल किंवा एसबीआय योनो अॅपद्वारे गुंतवणूक करावी लागेल.

हे कोणासाठी फायद्याचे?
एसबीआय अमृत कलश डिपॉझिट स्कीम अशा व्यक्तींसाठी चांगली आहे ज्यांना 1 ते 2 वर्षांसाठी आपले पैसे गुंतवायचे आहेत. एसबीआय अमृत कलश डिपॉझिट स्कीम अंतर्गत ही प्रीमॅच्युअर लोनची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज दिले जाणार आहे. उदाहरणार्थ, जर त्यांनी या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर 400 दिवसांनंतर त्यांना 8,600 रुपये व्याज मिळेल.

व्याजदरात वाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतीच मुदत ठेवी (एफडी) आणि रिकरिंग डिपॉझिट (आरडी) च्या व्याजदरात वाढ केली आहे, ज्यांचा मॅच्युरिटी कालावधी 7 दिवसते 10 वर्षांपर्यंत आहे. सामान्य नागरिकांना ३ ते ६.५० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ३.५० ते ७.५० टक्के दराने व्याज मिळणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Amrit Kalash FD Scheme interest rate benefits check details on 15 April 2023.

हॅशटॅग्स

#SBI Amrit Kalash FD Scheme(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x