16 May 2024 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

Sarkari Bank Shares | होय! या सरकारी बँकेचे स्वस्त शेअर्स मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, पहा शेअर्स किती स्वस्त आहेत

Sarkari Bank Shares

Sarkari Bank Shares | डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये उत्कृष्ट निकाल जाहीर केल्यानंतर बहुतांश बँकिंग शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. सर्व बँकिंग शेअर्समध्ये वाढ होत असताना कर्नाटक बँक, साऊथ इंडियन बँक, आणि यूको बँकेच्या शेअरने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊ स्टॉकच्या कामगिरीबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | South Indian Bank Share Price | UCO Bank Share Price | Karnataka Bank Share Price)

साउथ इंडियन बैंक :
डिसेंबर 2022 तिमाहीत या खाजगी क्षेत्रातील बँकेने 102.7 कोटी रुपये निव्वळ कमावला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत बँकेला 50 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. तथापि सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या बँकेने 223 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. बँकेचे एकूण परिचालन उत्पन्न 1671 कोटींवरून 13 टक्के वाढले आणि 1898 कोटी रुपयेवर गेले होते. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 0.30 टक्के वाढीसह 16.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

UCO बैंक :
कोलकाता स्थित UCO बँकेने डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये 653 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 310 कोटी रुपये होता, जो या तिमाहीत 110 टक्के जास्त वाढला आहे. युको बँकेच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. या काळात हा स्टॉक 11 रुपये प्रति शेअर किंमतीपासून 24.55 रुपये किमतीवर पोहचला आहे. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी युको बँक स्टॉक 0.41 टक्के वाढीसह 24.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कर्नाटक बैंक :
डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कर्नाटक बँकेच्या निव्वळ नफ्यात 105 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी याच कालावधीत बँकेला 146 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता, तर या तिमाहीत बँकेने 301 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत बँकेचा NPA 3.36 टक्के वरून 3.28 टक्केपर्यंत खाली आला आहे. याचा अर्थ बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे. त्याच वेळी बँकेच्या निव्वळ NPA मध्ये देखील 1.72 टक्के वरून घट झाली असून NPA 1.66 टक्केवर आला आहे. ब्रोकरेज हाऊस आनंद राठी यांच्या म्हणण्यानुसार बँकेच्या क्रेडिटमध्ये वाढ झाल्याने आणि पत खर्च कमी झाल्याने बँकेने मजबूत कमाई केली आहे. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.56 टक्के वाढीसह 139.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarkari Bank Shares South Indian Bank UCO Bank Karnataka Bank on 23 February 2023.

हॅशटॅग्स

South Indian Bank Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x