17 May 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला
x

Jayant Infratech Share Price | 60% घसरून स्वस्त झालेल्या शेअरवर फ्री बोनस मिळणार, गुंतवणूदारांची लॉटरी लागली, खरेदी करणार?

Jayant Infratech Share Price

Jayant Infratech Share Price | ‘जयंत इन्फ्राटेक लिमिटेड’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. बुधवार दिनांक 1 मार्च रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स बोनस म्हणून ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक 10.00 टक्के घसरणीसह 117.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर 2 बोनस शेअर्स वाटप केले आहेत. आज या स्टॉकमध्ये 10 टक्के लोअर सर्किट लागला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jayant Infratech Share Price | Jayant Infratech Stock Price | BSE 543544)

जयंत इन्फ्राटेक कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले होते की, कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 2 बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि बोनस इश्यूसाठी कंपनीने 1 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे. ज्या लोकांचे नाव रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना कंपनी बोनस शेअर्स वाटप करेल.

कंपनीची कामगिरी :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जयंत इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 10 टक्के घसरला आहे. बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर गुंतवणूकदारांनी अतिरिक्त शेअर्स विकून आपली गुंतवणूक काढून घेतली आणि मोफत शेअर्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांहून अधिक नकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jayant Infratech Share Price 543544 stock market live on 02 March 2023.

हॅशटॅग्स

Jayant Infratech Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x