3 May 2024 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

DP Wires Share Price| बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या शेअरमधून 5 पटीने कमाई केली, स्टॉक डिटेल्स पहा

DP Wires Share Price

DP Wires Share Price | ‘अमिताभ बच्चन’ हे फक्त बॉलिवूडचे शहेनशाह नसून गुंतवणूक करण्यात ही शहेनशाह आहेत. ‘अमिताभ बच्चन’ यांनी एका छोट्या कंपनीत पैसे लावून जबरदस्त परतावा कमावला आहे. ही कंपनी मुख्यतः वायर मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात गुंतलेली असून नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर सूचीबद्ध आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करतोय, तिचे नाव आहे, ‘डीपी वायर्स’. अमिताभ बच्चन यांनी ‘डीपी वायर्स’ कंपनीचे 3,32,800 शेअर्स म्हणजेच 2.45 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. सप्टेंबर 2018 पासून बिग बीकडे या कंपनीचे शेअर्स आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | D P Wires Share Price | D P Wires Stock Price | NSE DPWIRES)

5 वर्षात दिला 5 पट परतावा :
मागील पाच वर्षात ‘डीपी वायर्स’ या वायरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 4.87 पट वाढली आहे. ‘डीपी वायर्स’ कंपनीचे शेअर्स 3 सप्टेंबर 2018 रोजी NSE इंडेक्सवर 74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 मार्च 2023 रोजी या कंपनीच्या शेअर्सनी 359.85 रुपये किंमत पातळी स्पर्श केली आहे. ‘डीपी वायर्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाल्याने कंपनीचे बाजार भांडवल 488.92 कोटी रुपयेवर पोहचले आहे. सप्टेंबर 2018 मध्ये या कंपनीचे बाजार भांडवल फक्त 100.40 कोटी रुपये होते. ‘डीपी वायर्स’ कंपनीच्या शेअर्सची सर्वकालीन उच्चांक किंमत 502.80 रुपये होती.

गुंतवणूकदारांचा कंपनीत वाटा :
31 डिसेंबर 2022 पर्यंत डीपी वायर्स कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 70.40 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांनी कंपनीचे एकूण 8.88 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत, तर उच्च नेटवर्थ असणाऱ्या व्यक्तीकडे कंपनीचे 8.85 टक्के शेअर्स आहेत. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीच्या सेल्समध्ये 25.70 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 613.24 कोटी रुपये सेल्स नोंदवला आहे. FY17 मध्ये कंपनीचा निव्वळ सेल्स 195.38 कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचा नफा 5.02 कोटी रुपयांवरून वाढून 29.05 कोटी रुपयांवर गेला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
डीपी वायर्स ही कंपनी मुख्यतः स्टील वायर आणि प्लॅस्टिक फिल्म्स बनवण्याचे काम करते. मध्य प्रदेश स्थित कंपनी स्टील वायर्स आणि प्लॅस्टिक फिल्म्सचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचा व्यापार करते. कंपनी तेल आणि वायू, ऊर्जा, पर्यावरण, नागरी, ऊर्जा, ऑटोमोबाईल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांतील ग्राहकांना उत्पादनांचा पुरवठा करते. या कंपनीने उत्पादित केलेल्या प्लास्टिक उत्पादनांचा वापर लँडफिल, महामार्ग आणि रस्ते बांधकाम तलाव टाक्या यांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | DP Wires Share Price stock DPWIRES market live on 04 March 2023.

हॅशटॅग्स

DP Wires Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x