4 May 2024 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Alok Industries Share Price | मुकेश अंबानींच्या रिलायन्सची या कंपनीत मोठी हिस्सेदारी, शेअरची किंमत 12 रुपयांवर, खरेदी करणार?

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त सेलिंग प्रेशरला तोंड देत आहेत. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.60 टक्के घसरणीसह 12.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील पाच दिवसात ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 10.75 टक्के कमजोर झाले आहेत. 22 फेब्रुवारी 2023 रोजी ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 10.07 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमतीवर पोहचले होते. हा स्टॉक 11 एप्रिल 2022 रोजी 29.80 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमतीवर पोहचला होता.

स्टॉकची कामगिरी :
‘आलोक इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान केले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर 1.58 टक्के कमजोर झाले आहे. तर मागील पाच दिवसात हा स्टॉक 10.75 टक्के घसरला आहे. तथापि गुंतवणूकदारांना तिमाही, सहामाही, वार्षिक आणि दोन वर्षांच्या कालावधीत जबरदस्त नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. मागील पाच वर्षाच्या कालावधीत या स्टॉकने आपल्या गुतवणूकदारांचे 22.43 टक्के नुकसान केले आहे.

मुकेश अंबानींची गुंतवणूक :
मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीने ‘आलोक इंडस्ट्रीज’ कंपनीचे 37.7 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली होती. त्यासाठी अंबानींनी 250 कोटी रुपये खर्च केले होते. रिलायन्स, जेएमएम फायनान्शियल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने देखील ‘आलोक इंडस्ट्रीज’ कंपनीमध्ये पैसे लावले आहे. या कंपनीला डिसेंबर 2022 या तिमाहीत जबर नुकसान सहन करावा होता. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीला 249.83 कोटी रुपये नुकसान झाले होते. तर डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 0.09 कोटी रुपये नुकसान झाला होता.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘आलोक इंडस्ट्रीज’ ही कंपनी मुख्यतः कापड व्यवसायात गुंतली आहे. कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये कापूस आणि पॉलिस्टरचा वापर केला जातो. ‘आलोक इंडस्ट्रीज’ या कंपनीचे उत्पादन केंद्र गुजरातमधील बाघी आणि केंद्रशासित प्रदेश सिल्वासा या ठिकाणी कार्यरत आहे. ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ जगभरात विविध देशात आपल्या ग्राहकांना उत्पादने पुरवते. कंपनीच्या ग्राहक वर्गात जागतिक तसेच किरकोळ ब्रँड, परकीय आयातदार, खाजगी लेबल ब्रँड, देशांतर्गत किरकोळ व घाऊक व्यापारी, उत्पादक मोठ्या प्रमाणात सामील आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price return on investment check details on 13 March 2023.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x