29 April 2024 3:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Jai Mata Glass Share Price | बापरे! फक्त 2 महिन्यांत या शेअरने 740% परतावा दिला, आता हा शेअर 1 रुपया 71 पैशावर, काय करावं?

Jai Mata Glass Share Price

Jai Mata Glass Share Price | शेअर बाजारातील तज्ञ नेहमी गुंतवणुकदारांना पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करू नये असा सल्ला देत असतात. आणि गुंतवणूक केली तरी प्रॉफिट बुक करून वेळीच बाहेर पडणं देखील महत्वाचं असतं. मात्र काही गुंतवणुकदार स्वस्तात शेअर खरेदी करण्याच्या नादात आपलेच नुकसान करून घेतात. याचे सर्वात ताजे उदाहरण म्हणजे, ‘जयमाता ग्लास लिमिटेड’. जानेवारी 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत होते. मात्र आता या कंपनीच्या शेअरमध्ये उतरती कळा लागली आहे. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 1.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Jai Mata Glass Limited)

गुंतवणुकीवर नुकसान :
मागील पाच दिवसात ‘जयमाता ग्लास लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 17.79 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 57.25 टक्के नुकसान केले आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना 256.25 टक्के परतावा कमावून दिला होता, मते आता शेअर मध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे.

अवघ्या दोन महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 740 टक्के वाढले होते. जानेवारी ते फेब्रुवारी 2023 या कालावधी दरम्यान या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 180 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला होता. या काळात हा शेअर 1.44 रुपयांवरून वाढून 4.02 रुपयांवर पोहचला होता. 5 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 50 पैशांवर ट्रेड करत होते. तर 9 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 4.2 रुपये किमतीवर पोहचला होता. म्हणजेच दोन महिन्यांत या शेअरने आपल्या शेअर धारकांना 740 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जय माता ग्लास लिमिटेड ही कंपनी मुख्यतः काचेच्या व्यवसायात गुंतली असून, ती भारताच्या पूर्व आणि उत्तर भागात सेल्स एजंट म्हणून देखील काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jai Mata Glass Share Price 523467 return on investment check details on 15 March 2023.

हॅशटॅग्स

#Jai Mata Glass Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x