20 May 2024 4:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

KNR Constructions Share Price | गुंतवणूकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअरची कामगिरी पाहा, काही वर्षात पैसे दहापट वाढतील

KNR Constructions Share Price

KNR Constructions Share Price | ‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स’ या बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी ‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स’ कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के वाढीसह 248.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने लोकांना बक्कळ परतावा कमावून दिला आहे. मागील 14 वर्षापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता लाखो रुपये परतावा मिळाला आहे. पुढील काळात हा स्टॉक 335 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो असा अंदाज तज्ञांना व्यक्त केला आहे. सध्याच्या किंमत पातळीपेक्षा हा स्टॉक 36 टक्के वाढू शकतो. ‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स’ ही कंपनी मुख्यतः सिव्हिल आणि मेकॅनिकल कॉन्ट्रॅक्ट क्षेत्रात काम करते. ही कंपनी प्रकल्प महामार्ग, उड्डाणपूल, पूल इत्यादी बांधकाम देखील करते. (KNR Constructions Limited)

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स’ कंपनीने जबरदस्त महसूल संकलित केला होता. तथापि ब्रोकरेज फर्म नुवामाच्या मते आयकर कार्यवाहीशी संबंधित कर तरतुदीमुळे कंपनीचा नफा अपेक्षेपेक्षा कमी नोंदवला गेला होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 8 टक्क्यांच्या वाढीसह 830 कोटी रुपये जमा झाला होता. तथापि कंपनीचा समायोजित निव्वळ नफा याच कालावधीत 50 टक्क्यांनी कमी होऊन 51 कोटी रुपयांवर आला होता. व्याज खर्चाचाही कंपनीच्या नफ्यावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे. केरळमध्ये लांबलेल्या मान्सूनचा कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला. तथापि, ब्रोकरेज फर्म अजूनही या स्टॉक बाबत उत्साही पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्मने ‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स’ या कंपनीचे शेअर्स 316 रुपये लक्ष्यासह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर Axis Direct ने हा स्टॉक 310 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI Direct ने हा स्टॉक 305 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 28 नोव्हेंबर 2008 रोजी ‘KNR कन्स्ट्रक्शन्स’ कंपनीचे शेअर्स 2.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक 248.50 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 14 वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये 11475 टक्क्यांनी वाढवले असून त्यांना 1.16 कोटी रुपये परतावा दिला आहे. 4 एप्रिल 2022 रोजी ‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स’ कंपनीचे शेअर्स 297.35 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांकावर ट्रेड करत होते. त्यानंतर स्टॉक मध्ये घसरण सुरू झाली आणि शेअर 202.85 रुपये या आपल्या वार्षिक नीचांकी पातळीवर आला होता. सध्या हा स्टॉक आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या 17 टक्के खाली ट्रेड आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KNR Constructions Share Price on 29 March 2023.

हॅशटॅग्स

KNR Constructions Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x