18 May 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Tata Steel Share Price | स्वस्त झालेला टाटा स्टीलचा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, शेअरमध्ये मजबूत तेजी येण्याचे संकेत

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूह भारतातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीचे नियंत्रण करतो. ‘टाटा स्टील कंपनी’ ने नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षांत सुमारे 19.9 दशलक्ष टन क्रूड स्टीलचे उत्पादन करण्याचा विक्रम केला आहे. वार्षिक आधारावर टाटा स्टील कंपनीने केलेले हे सर्वाधिक उत्पादन आहे. एक वर्षभरापूर्वीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात टाटा स्टील कंपनीच्या उत्पादनात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. अस्थिर ऑपरेटिंग वातावरण असूनही 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीच्या डिलिव्हरीमध्ये वाढ झाली आहे. (Tata Steel Limited)

ब्रोकरेज फर्म शेअर्सबाबत उत्साही :
ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स बिनधास्त शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकवर 120 रुपये लक्ष्य किंमत दिली आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 104.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअरची कामगिरी :
टाटा स्टील कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात जवळपास 22.56 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील सहा महिन्यांत शेअर फक्त 1.16 टक्के वाढला आहे. मार्च 2023 तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च दरम्यान टाटा स्टील कंपनीचे क्रूड स्टील उत्पादन 3 टक्क्यांनी वाढले असून 5.15 दशलक्ष टन वर पोहचले आहे. डिलिव्हरी 9 टक्क्यांच्या वाढीसह 5.15 दशलक्ष टन वर पोहचली आहे. ही वाढ कंपनीची आतापर्यंतची सर्वांत जास्त तिमाही वितरण वाढ आहे. टाटा स्टील कंपनीच्या उत्पादन आणि वितरणामध्ये ही वाढ तिमाही आधारावर नोंदवली गेली आहे.

डिसेंबर 2022 तिमाहीत तोटा :
टाटा स्टील कंपनीला मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत 2,502 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मात्र एक वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीने नफा 9598.16 कोटी रुपये नफा कमावला होता. टाटा स्टील कंपनीच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या नफ्यात घसरण खर्चात वाढ झाल्यामुळे झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price on 07 April 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x