16 May 2024 8:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Torrent Power Share Price | कडक उन्हाळ्यात या कंपनीचे शेअर्स कडक परतावा देतील, वाढत्या विजेच्या मागणीचा फायदा

Torrent Power Share Price

Torrent Power Share Price | कडक उन्हाच्या झळा सर्वांना लागत आहेत. उन्हाळा जसजसा वाढत जाणार, तसे विजेची मागणीही वाढत जाणार. त्यामुळे सध्या एनर्जी सेक्टर मधील अनेक कंपन्या शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या रडारवर येत आहेत. यापैकीच एक आहे, ‘टोरेंट पॉवर’. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘टोरेंट पॉवर’ कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी ‘टोरेंट पॉवर’ कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के घसरणीसह 535.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Torrent Power Limited)

स्टॉकवाढीचे कारण :
उन्हाळ्यात विजेची अपेक्षित विक्रमी मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने मागितलेल्या 1,100 मेगावॅट गॅस आधारित वीज पुरवठ्यासाठी वीज उत्पादक सर्वात कमी बोली लावत असल्याच्या वृत्तानंतर ‘टोरेंट पॉवर’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी दिग्गज मीडिया हाऊसने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार ‘टोरेंट पॉवर’ कंपनीने गुजरातस्थित दोन गॅस आधारित प्रकल्पांमधून एप्रिल आणि मे महिन्यात फक्त 45 दिवसांसाठी 770 मेगावॅट वीज निर्मितीसाठी प्रति युनिट 13.70 रुपयेची बोली जाहीर केली आहे. त्याच वेळी उत्तराखंडस्थित ‘गामा इन्फ्राप्रॉप’ कंपनीने 14.9 रुपये प्रति युनिट एवढी बोली लावली आहे. तर ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीने 1010 मेगावॅट वीज निर्मितीच्या पुरवठ्यासाठी प्रति युनिट 20.5 रुपये एवढी बोली लावली आहे.

शेअरची कामगिरी :
आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी ‘टोरेंट पॉवर’ कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के घसरणीसह 535.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 25,573 कोटी रुपये आहे. तर 22 ऑगस्ट 2022 रोजी ‘टोरेंट पॉवर’ कंपनीचे शेअर्स 609.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 19 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 416 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11.53 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Torrent Power Share Price on 12 April 2023.

हॅशटॅग्स

Torrent Power Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x