17 May 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

JBM Auto Share Price | श्रीमंत करणारा शेअर! गुंतवणूकदारांना 13,480 टक्के इतका भरघोस परतावा दिला, का खरेदी करावा?

JBM Auto Share Price

JBM Auto Share Price | ‘जेबीएम ऑटो’ कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांसाठी जणू खजिनाच आहे. या कंपनीच्या शेअरने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा मिळवून दिला आहे. मागील सहा महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स.0.21 टक्के घसरणीसह 740.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. ‘JBM ऑटो’ कंपनीच्या स्टॉकने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 13,480 टक्के इतका भरघोस नफा कमावून दिला आहे. या स्टॉकने अवघ्या दहा वर्षात 10,000 रुपयांचे रूपांतर 13.5 लाख रुपये मध्ये केले आहे. हीच गुंतवणूक मागील 5 वर्षांत 323.64 टक्के वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (JBM Auto Limited)

शेअरची कामगिरी :
2023 या वर्षात ‘जेबीएम ऑटो’ कंपनीचे शेअर्स 45 टक्क्यांनी वाढले आहे. एप्रिल महिन्यात या स्टॉकमध्ये 16 टक्के, मार्च महिन्यात 12.5 टक्के, फेब्रुवारी महिन्यात 7.3 टक्के आणि जानेवारी महिन्यात 3.6 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ऑक्टोबर 2022 पासून ‘जेबीएम ऑटो’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरमध्ये 96 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ‘JBM Auto’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8,904 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ‘जेबीएम ऑटो’ कंपनीचे शेअर्स 361.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरमध्ये 110 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. जानेवारी 2023 च्या सुरुवातीला JBM ऑटो कंपनीने ‘ऑटो एक्सपो 2023’ मध्ये ‘Galaxy’ नावाचा पहिला स्वयं डिझाइन आणि स्वयं निर्मित इलेक्ट्रिक लक्झरी कोच लाँच केला होता. कंपनीने सिटी बस तसेच स्कूल बसेससह त्याच्या नवीन श्रेणीतील ई-बसचे देखील अनावरण केले होते.

‘जेबीएम ऑटो’ कंपनीची आर्थिक कामगिरी :
डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात 3.8 टक्क्यांची वाढ नोंदवली होती. कंपनीच्या एकूण निव्वळ नफा 34.33 कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफा 33.07 कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या 821.24 कोटी रुपयेच्या तुलनेत डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 16 टक्क्यांच्या वाढीसह 953.05 कोटी रुपयेवर पोहचली होती. दरम्यान कंपनीचा EBITDA 22 टक्क्यांच्या वाढीसह 114.75 कोटी रुपयेवर पोहचला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाही काळात 94.12 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JBM Auto Share Price on 12 April 2023.

हॅशटॅग्स

JBM Auto Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x