17 May 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
x

Sula Vineyards Share Price | दारू पिण्यापेक्षा या दारू कंपनीचे शेअर्स खरेदी करा, शेअरमध्ये तेजीची नशा, 1 दिवसात 13 टक्के वाढ

Sula Vineyards Share Price

Sula Vineyards Share Price | ‘सुला विनयार्ड्स’ या वाईन विक्रेत्या कंपनीचे शेअर्स सुसाट वेगात वाढत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 394.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के वाढीसह 386.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 23 जानेवारी 2023 रोजी ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचे शेअर्स 432 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. (Sula Vineyards Limited)

स्टॉक चर्चेत असण्याचे कारण :
‘सुला विनयार्ड्स’ कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये एलिट आणि प्रीमियम वाइनच्या एकूण विक्रीत 30 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. कंपनीची वाइन ब्रँड विक्रीने 1 दशलक्षचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये एलिट आणि प्रीमियम वाईन्सने 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत स्वतःच्या ब्रँड्स विक्रीतून 104.3 कोटी रुपये निव्वळ महसूल संकलित केला आहे. आणि वाइन पर्यटनातून कंपनीने 12.4 कोटी रुपये निव्वळ महसूल गोळा केला होता. त्याच वेळी आर्थिक वर्ष 2023 मध्ये ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीने ब्रँड्स विक्रीतून 482.5 कोटी रुपये निव्वळ महसूल संकलित केला होता. आणि वाईन पर्यटनातून कंपनीने 45 कोटी रुपये निव्वळ महसूल संकलित केला होता.

कंपनीचे तपशील :
‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचा IPO 2022 मध्ये लाँच करण्यात आला होता. डिसेंबर 2022 मध्ये ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले होते. कंपनीने आपल्या IPO साठी 340 रुपये ते 357 रुपये प्रति शेअर इश्यू किंमत जाहीर केली होती. स्टॉक डिस्काउंटवर सूचीबद्ध झाल्यानंतर मजबूत वाढ नोंदवली आहे. 2023 मध्ये आतापर्यंत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 17.09 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 18.68 टक्के वाढले होते तर महिल एका महिन्यात हा स्टॉक 12.27 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sula Vineyards Share Price on 13 April 2023.

हॅशटॅग्स

Sula Vineyards Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x