19 May 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल
x

Adani Total Gas Share Price Today | अदानी टोटल गॅसचा शेअर टोटली गॅसवर, रिकव्हर होणार की नाही? शेअरचं नेमकं काय होणार पहा

Adani Total Gas Share Price

Adani Total Gas Share Price Today | ‘हिंडनबर्ग’ चा अदानी ग्रुप विरोधातला वादग्रस्त अहवाल जाहीर होऊन जवळपास तीन महिने उलटल्यानंतरही अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स त्यांच्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 76 टक्के खाली ट्रेड करत आहेत. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी ‘अदानी टोटल गॅस’ या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के घसरणीसह 929.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 23 जानेवारी 2023 रोजी ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 3,998.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Adani Total Gas Limited)

1 मार्च 2023 रोजी ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 655 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरने मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे 75.82 टक्के पैसे बुडवले आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 73.78 टक्के आणि मागील सहा महिन्यांत ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 70.55 टक्के खाली पडले आहेत. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.04 लाख कोटी रुपये आहे.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
Tips2trades फर्मचे तज्ञ म्हणतात मी, कॉर्पोरेट गव्हर्नन्स समस्यांसह शेअर बाजारात आर्थिक मंदीच्या भावनांनी विक्रीचा दबाव निर्माण केला आहे. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 1030 रुपये या मजबूत प्रतिकार किमतीवर ट्रेड करत आहे. आणि मागील काही महिन्यात अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरच्या किमतीतही मोठी घसरण झाली होती. अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1262-1640 रुपये पर्यंत वाढू शकतात, असे तज्ञ म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Total Gas Share Price Today on 20 April 2023.

हॅशटॅग्स

#Adani Total Gas Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x