29 April 2024 4:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Yes Bank Share Price Today | तिमाही निकाल जाहीर केल्यावर येस बँक शेअरमध्ये घसरण, गुंतवणूकदारांनी काय करावे? तज्ञांचे मत

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price Today | मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. आजही स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.32 टक्के घसरणीसह 15.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. येस बँकचे तिमाही निकाल जाहीर झाल्यापासून गुंतवणूकदारांमध्ये शेअर होल्ड करावा की करू नये, असा संभ्रम निर्माण झाला आहे. (Yes Bank Limited)

येस बँकेच्या घसरत्या स्टॉकबाबत GCL सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ म्हणतात की, “चौथ्या तिमाहीच्या निकालांमुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते. एसबीआयसह मोठ्या बँकांचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपल्यानंतर शेअरमध्ये मोठी घसरण अपेक्षित होती. येस बँक आपले कर्ज फेडण्यास असमर्थ ठरली होती, आणि त्यामुळे SBI आणि इतर बँकानी बँक बुडण्यापासून वाचवली होती. मात्र त्यांच्यावर शेअर न विकण्याचे 3 वर्षाचे बंधन टाकण्यात आले होते.

गुंतवणूकदारांसाठी सल्ला :
चॉईस ब्रोकिंग फर्मचे तज्ञ म्हणाले की, “येस बँकेच्या स्टॉकमध्ये 15.25 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट आहे. तज्ञांनी गुंतवणुकदारांना येस बँकेच्या शेअर्सवर 15 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. जर शेअरने 18.50 रुपये किंमत पार केली तर हा स्टॉक आणखी वाढू शकतो, असे तज्ञ म्हणाले.

येस बँक स्टॉक लक्ष्य किंमत :
GCL सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ म्हणाले की, जर येस बँक स्टॉक 18.50 रुपये किमतीच्या पार गेला तर पुढील काळात हा स्टॉक 22 ते 24 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मात्र जर स्टॉक 15 रुपयांच्या खाली आला तर पुढील काळात स्टॉक 12.50 ते 13 रुपयांवर जाऊ शकतो, असे तज्ञ म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price Today on 25 April 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(128)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x