30 April 2024 9:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये कमालीची तेजी, स्टॉक वाढीचे कारण जाणून गुंतवणूक करा, फायदा होईल

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा ग्रुपची उपकंपनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ लवकरच आपला IPO बाजारात लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने SEBI कडे DRHP दाखल करून दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओबाबत बातमी आली आहे, तेव्हापासून ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे.

टाटा मोटर्स कंपनी सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीजवळ ट्रेड करत आहे. टाटा मोटर्स कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकालअपेक्षेपेक्षा चांगले आल्याने टाटा मोटर्स स्टॉकवर गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी वाढला आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 2.89 टक्के वाढीसह 530.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा मोटर्स कंपनीचा Q4 निकाल :
आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 5408 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. यापूर्वी आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच तिमाहीत कंपनीला 1,033 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2023 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 1,05,932 कोटीवर पोहचले होते. जानेवारी-मार्च 2022 मध्ये टाटा मोटर्स कंपनीचे उत्पन्न 78,439 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

टाटा टेक्नॉलॉजी IPO :
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने एकूण 74.69 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. टाटा मोटर्स कंपनी पुढील काळात आपले 9.571 कोटी शेअर्स IPO द्वारे खुल्या बाजारात विकणार आहे. 9 मार्च 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्र जमा केले होते. जबरदस्त तिमाही निकालानंतर टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत वेगात वाढत आहे. तज्ञ देखील टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहे.

प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 590 रुपयेवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.43 टक्क्यांनच्या वाढीसह 513.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price today on 15 May 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(86)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x