1 May 2024 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Crayons Advertising Share Price | क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग कंपनीच्या IPO ला बंपर रिस्पॉन्स मिळत आहे, तपशील पाहून स्टॉक खरेदी करा

Highlights:

  • पहिल्याच दिवशी 4 पट सबस्क्राइब
  • क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग GMP
  • IPO तपशील
  • 2 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होतील
Crayons Advertising Share Price

Crayons Advertising Share Price | ‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ या जाहिरात क्षेत्रात व्यापार करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO 22 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. किरकोळ गुंतवणूकदारांच्या जोरदार मागणीमुळे ‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ कंपनीचा IPO अवघ्या काही तासांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. (Crayons Advertising IPO GMP Today)

पहिल्याच दिवशी 4 पट सबस्क्राइब
‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ कंपनीचा IPO गुंतवणुकीच्या पहिल्याच दिवशी 4 पट सबस्क्राइब झाला आहे. IPO मधील किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 7.88 पट सबस्क्राइब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 1.27 पट सबस्क्राइब झाला आहे. आणि पात्र संस्थात्मक गुंतवणूकदाराचा राखीव कोटा 0.01 पट सबस्क्राइब झाला आहे.

‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ GMP :
‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ कंपनीच्या IPO ला ग्रे मार्केटमध्ये देखील जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 62 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत बँड 62-65 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर या कंपनीचे शेअर्स 65 रुपये अप्पर प्राइस बँडवर वाटप केले गेले आणि 62 रुपयांचा ग्रे मार्केट प्रीमियम टिकुन राहिला, ते या कंपनीचे शेअर्स 127 रुपये किमतीवर सूचीबद्ध होतील. म्हणजेच गुंतवणूकदार स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 95 टक्के नफा मिळेल.

IPO तपशील :
क्रेयॉन्स अॅडव्हर्टायझिंग कंपनीने IPO लाँच करण्यापूर्वी आपल्या अँकर गुंतवणूकदारांना 18.30 लाख शेअर्स विकले होते. युरोपची बँक Societe Generale ODI आणि इतर देशांतर्गत संस्थात्मक फंड हाऊसने ‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ कंपनीच्या अँकर बुकचे सदस्यत्व घेतले आहे. Societe Generale ODI ने 4.62 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. याव्यतिरिक्त, राजस्थान ग्लोबल सिक्युरिटीज, एनएव्ही कॅपिटल इमर्जिंग स्टार फंड, सिल्व्हर स्टॅलियन फंड यांनी देखील अँकर फंडींग राऊंडमध्ये गुंतवणूक केली आहे.

2 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होतील
‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ कंपनीचे शेअर्स 2 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होतील. ‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ कंपनीचा IPO 25 मे 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. त्याच वेळी 30 मे 2023 पर्यंत गुंतवणूकदारांना शेअरचे वाटप केले जाईल. कंपनीचे शेअर्स 2 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. ‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 41.80 कोटी रुपये भांडवल उभारणी करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Crayons Advertising Share Price today on 23 May 2023

FAQ's

How to subscribe Crayons Advertising IPO?

आपण सबस्क्राईबसाठी एएसबीए आणि नॉन-एएसबीए पर्यायांसह जाऊ शकता. आपल्या बँक खात्यात जाऊन एएसबीएच्या माध्यमातून आयपीओसाठी ऑनलाइन अर्ज करा किंवा ऑनलाइन फॉर्म डाऊनलोड करा किंवा फिजिकल फॉर्म मिळवा आणि भरलेला फॉर्म आपल्या ब्रोकर किंवा बँकेकडे सबमिट करा.

What is the Crayons Advertising IPO Listing Date?

क्रेयॉन्स अॅडव्हर्टायझिंग आयपीओ लिस्टिंग ची तारीख 2 जून 2023 आहे. हा आयपीओ एनएसईवर सूचीबद्ध होणार आहे.

What is Crayons Advertising IPO GMP Today?

Crayons Advertising IPO GMP is Rs.40 as of today.

How do you calculate IPO listing price from GMP?

जीएमपी गणनेची प्रक्रिया गुंतागुंतीची नाही. समजा XYZ’ कंपनीच्या आयपीओची किंमत ९०० रुपये प्रति शेअर आहे. त्यासाठी जीएमपी १०० रुपये आहे. त्यानंतर संस्थेचे शेअर्स 1000 रुपयांना सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

Crayons Advertising Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x