16 May 2024 10:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

NELCO Share Price | टाटा ग्रुपचा शेअर तेजीत, नेल्को शेअरने एका दिवसात 16 टक्के परतावा दिला, पुढे फायदा घेणार?

Highlights:

  • NELCO Share Price
  • नेल्को शेअरने एका दिवसात 16 टक्के परतावा दिला
  • लाभांश वाटप करण्याचा रेकॉर्ड डेट
  • कंपनीने मोठा व्यावसायिक करार केला
NELCO Share Price

NELCO Share Price | एकीकडे भारतीय शेअर बाजारात कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे असे काही शेअर्स आहेत, जे तेजीत वाढत आहेत. काल मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा समूहाचा भाग असलेल्या नेल्को कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळत होती.

नेल्को शेअरने एका दिवसात 16 टक्के परतावा दिला

ट्रेडिंग दरम्यान हा स्टॉक 16 टक्के वाढीसह 739 रुपये किमतीवर पोहचला होता. NELCO कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी दर्शनी किमतीवर 20 टक्के म्हणजेच प्रति इक्विटी शेअर 2 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

लाभांश वाटप करण्याचा रेकॉर्ड डेट

लाभांश वाटप करण्याचा रेकॉर्ड डेट म्हणून 6 जून 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला होता. NELCO कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 22 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संचालक मंडळाच्या लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव विचारात घेतला जाईल. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के घसरणीसह 708.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीने मोठा व्यावसायिक करार केला

NELCO कंपनीच्या स्टॉकमध्ये अचानक तेजीचे कारण म्हणजे कंपनीने मोठा व्यावसायिक करार केला आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या नेल्को Piscis Networks मधील 9.09 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यासाठी कंपनी 99.99 लाख रुपये गुंतवणूक करणार आहे. यासाठी NELCO कंपनीने व्यापारी करार केला आहे. नेल्को कंपनीने पिसिस नेटवर्क्समध्ये 30 टक्केपर्यंत हिस्सा वाढवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

पिसिस नेटवर्क्स ही एक मुंबईस्थित कंपनी आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात पिसिस नेटवर्क्स कंपनीने 6.77 लाख रुपयेचा व्यवसाय केला होता. त्याचवेळी 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने 98.10 लाख रुपये मुल्याचा व्यवसाय केला होता. पिसिस नेटवर्क्स या कंपनीची स्थापना 2021 मध्ये झाली होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NELCO Share Price today on 07 June 2023.

हॅशटॅग्स

#Nelco Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x