20 May 2024 12:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Titan Share Price | टाटा तिथे नो घाटा! टायटन शेअर्समधून झुनझुनवाला कुटुंब बक्कळ पैसा छापत आहेत, असे स्टॉक खरेदी करा

Titan Share Price

Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सुसाट तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 3211.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टायटन कंपनीच्या शेअर काल आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. टायटन कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3105 70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवारी एका दिवसात टायटन कंपनीच्या शेअसमध्ये तब्बल 105.40 रुपयाची वाढ पाहायला मिळाली होती. (Titan Company Share Price)

टायटन कंपनीच्या शेअरमध्ये दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी मोठी गुंतवणुक केली आहे. टायटन कंपनीच्या शेअर्समधील तुफान वाढीमुळे झुनझुनवाला कुटुंबाने जबरदस्त नफा कमावला आहे. रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीच्या शेअरमधून 495 कोटी रुपये परतावा कमावला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचे 46945970 शेअर्स होल्ड केले आहेत. याचे एकूण प्रमाण कंपनीच्या भांडवलाच्या तुलनेत 5.29 टक्के आहे.

टायटन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एका दिवसात तब्बल 105.40 रुपये वाढले होते. टायटन कंपनीच्या शेअर्समधील या उसळीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीत एकाच दिवसात 495 कोटी रुपये वाढ झाली होती. भारतीय शेअर बाजारपेठेत बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले होते. टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक झालेली ही वाढ कंपनीने आर्थिक वर्ष 2023-2024 च्या पहिल्या तिमाहीत 20 टक्के महसूल वाढ नोंदवल्यामुळे पाहायला मिळत आहे.

टायटन कंपनीच्या ज्वेलरी विभागात जून 2023 तिमाहीत 21 टक्के वाढ नोंदवली गेली असून अरेबल्स विभागात वार्षिक 13 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या विक्रीमधे वर्षभरात 10 टक्के वाढ झाली नोंदवली गेली आहे. सुगंध आणि फॅशन अचसेसरीज विभागामध्ये वार्षिक आधारावर 11 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

टायटन कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. टायटन कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात तब्बल 50 टक्के मजबूत झाले आहेत. 7 जुलै 2022 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 2128 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 7 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 3211.10 रूपये किमतीवर पोहोचला आहे. 2023 या वर्षात टायटन कंपनीच्या शेअर्सने लोकांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Share Price today on 08 July 2023.

हॅशटॅग्स

#Titan Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x