18 May 2024 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Gallantt Ispat Share Price | मल्टिबॅगर गॅलंट इस्पात शेअर्स उच्चांक पातळीवर, मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी वाढली? मोठा परतावा मिळणार?

Gallantt Ispat Share Price

Gallantt Ispat Share Price | गॅलंट इस्पात कंपनीने भारतीय रेल्वेसोबत केलेल्या नवीन करारामुळे कंपनीच्य शेअर्समध्ये इतकी खरेदी वाढली की, शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचली होती. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. भारतीय रेल्वे कंपनीने रेल्वे वॅगन्सच्या कमतरतेची समस्या सोडवण्यासाठी ईस्ट कोस्ट रेल्वे, भुवनेश्वर, ओडिशा यांच्यासोबत एक MOU केला आहे. (Gallantt Share Price)

या निर्णयामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होणार आहे. ही कराराची बातमी येताच गॅलंट इस्पात कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 69.65 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसा अखेर गॅलंट इस्पात कंपनीचे शेअर्स 75.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी गॅलंट इस्पात कंपनीचे शेअर्स 2.60 टक्के घसरणीसह 71.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गॅलंट इस्पात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे मालवाहतूक शुल्कावर 15 टक्के प्रीमियम आकारून प्राधान्या आधारावर रॅक प्रदान करते. असे असूनही मल वाहतुकीसाठी रेल्वेचे पुरेसे रॅक उपलब्ध होत नाही. त्यामुळे गॅलंट इस्पात कंपनी रेल्वे बोर्डाच्या जनरल पर्पज वॅगन इन्व्हेस्टमेंट स्कीम अंतर्गत दोन रेल्वे रॅक खरेदी करण्याचा विचार करत आहे. भारतीय रेल्वे GPWI योजने अंतर्गत 15 वर्षांसाठी रेल्वे मालवाहतुकीच्या दरांवर शून्य टक्के शुल्क आकारते. अशा प्रकारे एकूणच कंपनीच्या मालवाहतुक खर्चात 25 टक्के बचत होऊ शकते.

गॅलंट इस्पात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दोन रेल्वे रॅक खरेदी करण्यासाठी त्यांना 55 कोटी रुपये द्यावे लागतील. मात्र स्वतःचे रॅक असल्याने कंपनीला कच्चा माल वेळेवर मिळेल, त्रास मुक्त आणि किफायतशीरपणे मालवाहतूक केली जाईल. पहिला रॅक जुलै 2023 च्या शेवट पर्यंत मिळेल. तर दुसरा रॅक नोव्हेंबर 2023 पर्यंत मिळेल. गॅलंट इस्पात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या व्यवस्थापन मंडळांच्या अपेक्षेनुसार सर्वकाही घडले तर गॅलंट इस्पात कंपनी कच्चा मालवाहतूक करण्यासाठी आणखी रेल्वे रॅक खरेदी करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gallantt Ispat Share Price today on 11 July 2023.

हॅशटॅग्स

Gallantt Ispat Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x