20 May 2024 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, अवघ्या 5 दिवसात दिला 13.54 टक्के परतावा, पुढचा तपशील जाणून घ्या

Suzlon Share Price

Suzlon Share Price | आज शेअर बाजारात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल महावीर अग्रवाल यांनी देखील सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे तब्बल 13 कोटी शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. (Suzlon Energy Share Price)

सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये मुकुल अग्रवाल यांनी 1.04 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के वाढीसह 20.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची कामगिरी :

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मुकुल अग्रवाल यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी 1 टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स असतात, त्यांचे नाव शेअर धारकांच्या यादीत जाहीर केले जाते. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 19.66 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

1 वर्षात 249.49 टक्के परतावा :

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जोरदार परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 249.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीला 5.92 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीला 30.72 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 24 July 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x