17 May 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stock | काय म्हणावं? या शेअरमध्ये लोकांनी 77000 रुपये गुंतवून आज करोडोचे फ्लॅट विकत घेतले, शेअरची परतावा डिटेल्स पहा

Multibagger Stock

Multibagger Stock | भारतातील प्रसिद्ध ग्राहकोपयोगी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या मॅरिको कंपनीचे शेअर्स मंदीच्या काळात देखील तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मॅरिको कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 577.25 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये ही तेजी एका डीलमुळे पाहायला मिळत आहे. (Multibagger Stocks)

या डील अंतर्गत मॅरिको कंपनीला आपल्या प्लांट आधारित न्यूट्रिशन ब्रँडच्या मूळ कंपनीमध्ये निम्म्यापेक्षा अधिक भाग भांडवल मिळणार आहे. 20 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी मॅरिको कंपनीच्या शेअरमध्ये 77,000 रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी मॅरिको कंपनीचे शेअर्स 3.39 टक्क्यांच्या वाढीसह 573.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मॅरिको ही भारतातील प्रसिद्ध कंपनी आरोग्, सौंदर्य प्रसाधन आणि पर्सनल केअर उत्पादन संबंधित व्यवसाय करते. या कंपनीचा व्यवसाय भारत आणि आशियाई तसेच आफ्रिकेतील 25 पेक्षा जास्त देशांमध्ये विस्तारलेला आहे. मॅरिको कंपनीच्या शेअरने अवघ्या 20 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. मॅरिको कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सॅटिया न्यूट्रास्युटिकल्स कंपनीमधील 58 टक्के भाग भांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने या संबंधित करार देखील केला आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, या डीलचे मूल्य 369.01 कोटी रुपये आहे. द प्लांट फिक्स-फ्लिक्स या वनस्पती आधारित पोषण तेल ब्रँडची मालकी सॅटिया न्यूट्रास्युटिकल्स कडे आहे. आता मॅरिको कंपनीने सॅटिया न्यूट्रास्युटिकल्स कंपनीचे शेअर्स निम्म्यापेक्षा अधिक शेअर्स खरेदी केले आहे.

मॅरिको कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मॅरिको कंपनीने प्रत्यक्षरित्या 32.75 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. आणि याआधी 25.25 टक्के भाग भांडवल मॅरिको कंपनीने 25 जुलै 2003 रोजी 4.38 रुपये किमतीवर खरेदी केले होते. आता हा स्टॉक 573 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच अवघ्या 20 वर्षात 77000 रुपये गुंतवणूक केलेल्या लोकांना करोडो रूपये परतावा मिळाला आहे. 20 एप्रिल 2023 रोजी मॅरिको कंपनीचे शेअर्स 462.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 जुलै 2023 म्हणजेच अवघ्या तीन महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 23 टक्क्यांनी वाढून 571 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Marico share price today on 29 July 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x