19 May 2024 11:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला
x

Indo Count Share Price | वेगात कमाई! मागील 5 महिन्यांत इंडो काउंट शेअरने 147 टक्के परतावा दिला, आता तज्ज्ञांनी दिली नवी टार्गेट प्राईस

Indo Count Share Price

Indo Count Share Price | इंडो काउंट या घरगुती कापड उत्पादक आणि निर्यातदार कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. मागील पाच महिन्यांत इंडो काउंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 147 टक्के परतावा कमावून दिला आहे.

या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मागील 11 वर्षात अवघ्या 60,000 रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवले आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते इंडो काउंट कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 19 टक्के अधिक वाढू शकतात. आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी इंडो काउंट कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के घसरणीसह 245.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडो काउंट कंपनीचे शेअर्स 2.64 टक्क्यांच्या वाढीसह 248.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 17 ऑगस्ट 2012 रोजी इंडो काउंट कंपनीचे शेअर्स 1.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 248.80 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 11 वर्षांत इंडो काउंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 16598 टक्के परतावा कमावून दिला आहे.

28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 101.15 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या पाच महिन्यांत शेअरची किंमत 147 टक्के मजबूत झाली आहे. 22 ऑगस्ट रोजी हा स्टॉक 250 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता.

इंडो काउंट ही कंपनी मुख्यतः घरगुती कापडांचे उत्पादन आणि निर्यात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी बेडशीट, गादी- रजाई बनवण्याचे काम करते. अमेरिकेतील टॉप 10 मोठ्या रिटेलर्समध्ये ही कंपनी 9 व्या स्थानावर आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने या कंपनीला पुढील काळात मुक्त व्यापार करार आणि निर्यात प्रोत्साहन धोरणाचा फायदा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय निर्यातदारांना मुक्त व्यापार धोरणाचा व्यवसाय वाढीसाठी मोठी फायदा होणार आहे. या संधीचा फायदा घेण्याची जबरदस्त क्षमता इंडो काउंट कंपनीमध्ये आहे. या सर्व बाबींचा विचार करून तज्ञांनी इंडो काउंट कंपनीच्या शेअरवर 295 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. तज्ज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये इंडो काउंट कंपनीच्या शेअरचा EPS प्रमाण 13 पट राहू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indo Count Share Price for investment on 23 August 2023.

हॅशटॅग्स

Indo Count Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x