19 May 2024 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Sika Interplant Share Price | मागील 1 महिन्यात सिका इंटरप्लांट शेअरने 65 टक्के परतावा दिला, आता 'या' बातमीने तुफान तेजी येणार?

Sika Interplant Share Price

Sika Interplant Share Price | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना नेहमी, वाढता नफा आणि वाढता महसूल असलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी. कारण अशा कंपन्याच्या कामगिरीवर गुंतवणूकदारांचा आणि शेअर बाजाराचा जास्त विश्वास असतो. आज या लेखात आपण अशाच एका शेअर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या कंपनीचे नाव आहे, सिका इंटरप्लांट.

मागील काही दिवसापासून सिका इंटरप्लांट कंपनीच्या शेअरमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. सिका इंटरप्लांट कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीला 117 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सिका इंटरप्लांट कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सिका इंटरप्लांट कंपनीचे शेअर्स 4.56 टक्के वाढीसह 1,272.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअरची कामगिरी :

मागील 5 दिवसात सिका इंटरप्लांट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सिका इंटरप्लांट सिस्टम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. सिका इंटरप्लांट कंपनीचे एकूण बाजार भांडवल 516 कोटी रुपये आहे.

मागील 1 वर्षात सिका इंटरप्लांट कंपनीच्या शेअरची किंमत 75 टक्के अधिक वाढली आहे. तर मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 700 टक्के वाढली आहे. 24 जुलै 2020 रोजी सिका इंटरप्लांट कंपनीचे शेअर्स 155 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअरची किंमत 8 पट अधिक वाढली आहे.

मागील 2 दिवसांपासून सिका इंटरप्लांट सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. सिका इंटरप्लांट कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. सिका इंटरप्लांट कंपनीने जून तिमाहीत 5 कोटी पेक्षा जास्त निव्वळ नफा कमावला आहे. नुकताच या कंपनीला प्रगत अभियांत्रिकी उत्पादने आणि सेवा संबंधित 117 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती.

सिका इंटरप्लांट ही कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी एरोस्पेस, संरक्षण, अंतराळ आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्राशी संबंधित उत्पादने आणि सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. मागील 3 वर्षांत सिका इंटरप्लांट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sika Interplant Share Price today on 26 August 2023.

हॅशटॅग्स

Sika Interplant Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x