31 May 2024 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉकचार्टवर कोणते संकेत? स्टॉक रेटिंग बदलली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, ऑर्डरबुक मजबूत झाली, कमाईची मोठी संधी Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 01 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Affle Share Price | तज्ज्ञांकडून या 5 स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 38 टक्केपर्यंत परतावा NMDC Share Price | PSU स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, शॉर्ट टर्ममध्ये देणार मोठा परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉकसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून खरेदीला गर्दी IRB Infra Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 58% परतावा, पुढे तेजी येणार? स्टॉक 'Hold' करावा की Sell?
x

Vodafone Idea Share Price | फक्त 10 रुपयाचा पेनी स्टॉक! व्होडाफोन-आयडिया शेअर रोज 10-11 टक्के परतावा देतोय, शेअर एवढा तेजीत का?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया लिमिटेड या कर्जबाजारी टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना सुखद धक्का दिला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स एका दिवसात 12 टक्क्यांनी वाढले होते. व्होडाफोन-आयडिया लिमिटेड स्टॉकने आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 80 टक्के वाढ नोंदवली आहे.

शुक्रवारी 1 दिवसात 11.05 टक्के परतावा दिला

मागील एका वर्षाच्या कालावधीत वोडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा 10 रुपये किमतीवर पोहचले आहेत. एकेकाळी व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर कर्जबाजारी झाल्याने कंपनीचे शेअर्स 3.30 रुपये किमतीवर आले होते. शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.05 टक्के वाढीसह 10.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या कंपनीच्या शेअरमध्ये अशी तेजी शेवटची सप्टेंबर-डिसेंबर 2012 तर आणि जानेवारी-फेब्रुवारी 2013 दरम्यान पाहायला मिळाली होती. या दूरसंचार ऑपरेटर कंपनीच्या शेअरमध्ये मागील नऊ ट्रेडिंग सेशनपैकी सातमध्ये अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. 2023 या वर्षात व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.7 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 80 टक्क्यांनी वाढले आहेत.

मागील पाच दिवसात 18 टक्के परतावा दिला

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 18 टक्के वाढली आहे. शुक्रवारी व्होडाफोन-आयडिया स्टॉक 9:15 रुपये किमतीवर ओपन झाला होता. आणि दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 10:40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचली होती.

मागील एका वर्षात व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी जून 2023 तिमाहीची थकबाकी आणि स्पेक्ट्रमचा हप्ता सप्टेंबर 2023 मध्ये भरणार असल्याची बातमी आल्याने गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे. व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीला जुलै 2023 पर्यंत 770 कोटी रुपये परवाना शुल्क म्हणून आणि मागील वर्षी खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमचा पहिला हप्ता म्हणून 1,680 कोटी रुपये थकबाई भरणे आवश्यक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price today on 02 September 2023.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x