19 May 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Jupiter Hospitals IPO | आला रे आला IPO आला! ज्युपिटर लाईफ लाइन IPO लाँच होतोय, गुंतवणुकीतून फायदा घ्या, शेअरची प्राईस बँड पहा

Jupiter Hospitals IPO

Jupiter Hospitals IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एख आनंदाची बातमी आहे. लवकरच ज्युपिटर लाईफ लाइन ही मुंबईस्थित हॉस्पिटल चेन कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. ज्युपिटर हॉस्पिटल्स कंपनीचा IPO 6 सप्टेंबर 2023 ते 8 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.

कंपनी आपल्या अँकर गुंतवणूकदारांना 5 सप्टेंबर रोजी शेअर वाटप करेल. या कंपनीने मे 2023 मध्ये IPO साठी प्राथमिक कागदपत्रे सेबीला सादर केली होती. आणि मागील आठवड्यात सेबीने ज्युपिटर लाईफ लाइन कंपनीला आयपीओ लाँच करण्याची परवानगी दिली आहे.

ज्युपिटर हॉस्पिटल्स IPO तपशील

ज्युपिटर लाईफ लाइन कंपनी आपल्या IPO अंतर्गत 542 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. आणि कंपनी आपले 44.55 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 869 कोटी रुपये असेल. ज्युपिटर लाईफ लाइन कंपनीच्या IPO मध्ये देवांग वसंतलाल गांधी OFS अंतर्गत 12.5 लाख शेअर्स खुल्या बाजारात जारी करतील. आणि देवांग गांधी आणि नीता गांधी त्यांचे नऊ लाख इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात जारी करणार आहे.

ज्युपिटर लाईफ लाइन कंपनीच्या IPO मध्ये शेअर्स विकणाऱ्या शेअर धारकांमध्ये नितीन ठक्कर, अनुराधा रमेश मोदी, भास्कर पी शाह, राजेश्वरी कॅपिटल मार्केट, व्ही.एस. राघवन हे सर्व सामील आहेत. ज्युपिटर लाईफ लाइन कंपनीची स्थापना 2007 साली ठाणे जिल्ह्यात झाली होती. मागील 15 वर्षांपासून ज्युपिटर लाईफ लाइन कंपनी आरोग्य सेवा क्षेत्रात व्यवसाय करत आहे.

या कंपनीचे हॉस्पिटल सध्या ठाणे, पुणे आणि इंदूर या शहरात चालू आहेत. ज्युपिटर हॉस्पिटल कंपनीने आपले धोरणात्मक लक्ष पश्चिम भारतातील आरोग्य सेवा बाजारावर केंद्रीत केले आहे. ही कंपनी सध्या डोंबिवलीमध्ये एक मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे काम करत आहे.

ज्युपिटर लाईफ लाइन कंपनीच्या IPO मध्ये ICICI सिक्युरिटीज आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट आणि जेएम फायनान्शिअल यांना बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आणि KFin Technologies या कंपनीला IPO चे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील.

ज्युपिटर लाईफ लाइनज्युपिटर लाईफ लाइन कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 695-735 रुपये निश्चित केली आहे. एका लॉटमध्ये कंपनी 20 शेअर्स जारी करणार आहे. तुम्हाला जर या IPO मध्ये पैसे लावायचे असतील तर तुम्हाला किमान 14,700 रुपये जमा करावे लागणार आहे.

ज्युपिटर लाईफ लाइन कंपनीच्या IPO अंतर्गत पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. NII साठी कंपनीने 15 टक्के कोटा, आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. ज्युपिटर लाईफ लाइन IPO 6 ते 8 सप्टेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. आणि IPO शेअर्सचे वाटप 13 सप्टेंबर 2023 रोजी केले जातील. 15 सप्टेंबरपर्यंत IPO स्टॉक गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील. आणि स्टॉक 18 सप्टेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jupiter Hospitals IPO today on 02 September 2023.

हॅशटॅग्स

Jupiter Hospitals IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x