18 May 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Vikas Lifecare Share Price | मालामाल पेनी स्टॉक! विकास लाइफकेअर पेनी शेअरने अप्पर सर्किटवर, आज 13.89% परतावा, खरेदी करावा का?

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price| विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच कंपनीने 97 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. कंपनी प्रेफरंस शेअर्स जारी करून भांडवल उभारणी करणार आहे. हे प्रेफरंस शेअर्स 4 रुपये प्रति शेअर या किमतीवर जारी केले जाणार आहेत.

भांडवल उभारणीची बातमी शेअर बाजारात पसरल्यानंतर मागील आठवड्याच्या गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 5.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 13.89 टक्के वाढीसह 6.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीचा पेनी स्टॉक BSE आणि NSE दोन्ही इंडेक्सवर ट्रेड करत आहेत. नुकताच विकास लाइफकेअर स्टॉक 5.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअरची नीचांक पातळी किंमत 2.70 रुपये आहे.

आजकाल बाजारात वडापाव सुद्धा 20 रुपयेला मिळतो, मात्र या कंपनीचे शेअर्स अजूनही 5 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आणि एवढेच नाही तर हा पेनी स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई सुद्धा करून देतो.

स्टॉक मार्केट नियामक फायलिंगमध्ये कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीने प्रेफरंस शेअर्स वाटप करून भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि यासाठी कंपनीने प्रेफरंस शेअर्सची किंमत 4 रुपये निश्चित केली आहे. याद्वारे कंपनी 97 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.

शेअरधारकांची मंजुरी मिळाल्यास कंपनी पुढील प्रक्रिया सुरू करेल. विकास लाइफकेअर कंपनीने 30 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन देखील केले आहे. या AGM मध्ये कंपनी आपली पुढील व्यावसायिक योजना जाहीर करण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price today on 11 September 2023.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x