19 May 2024 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

Nirman Agri Genetics Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 6 महिन्यात पैसा दुप्पट वाढला, निर्माण अ‍ॅग्री जेनेटिक्स शेअर्सची खरेदी वाढली

SME Share Price

Nirman Agri Genetics Share Price | निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड कंपनीचा IPO 2023 च्या सुरुवातीला शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या IPO स्टॉकने गुंतवणूकदारांना जोरदार नफा कमावून दिला. मार्च 2023 मध्ये निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड कंपनीचा IPO स्टॉक NSE-SME इमर्ज इंडेक्सवर सूचीबद्ध झाले होते.

स्टॉक लिस्ट झाल्यावर अवघ्या सहा महिन्यांत निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 192.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 99 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर केली होती. निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO 15 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचे शेअर्स 28 मार्च 2023 रोजी NSE SME इमर्ज इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले होते.

निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचे शेअर्स ज्यावेळी SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाले होते, त्यावेळी शेअरची किंमत 102 रुपये होती. म्हणजेच गुंतवणुकदारांना स्टॉक लिस्टिंगमशून जास्त काही कमाई झाली नव्हती. मात्र स्टॉक सूचीबद्ध झाल्यावर जबरदस्त तेजीत वाढला आणि अवघ्या दहा महिन्यात निर्माण अॅग्री जेनेटिक्स स्टॉकची किंमत 204 रुपये किमतीवर पोहचली होती. अशा परिस्थितीत ज्या गुंतवणूकदाराने आपले IPO शेअर्स होल्ड केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले आहे.

नुकताच निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिटेड कंपनीने तोशन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत एक व्यापारी सामंजस्य करार संपन्न केला आहे. या कराराच्या माध्यमातून कंपनीच्या उत्पादनांमध्ये आणि जागतिक तसेच परकीय बाजारपेठेतील पोहोचमध्ये लक्षणीय विस्तार होण्याची शक्यता आहे. या नवीन करारामुळे निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड कंपनीचे उत्पन्न किमान 30 कोटीनी अधिक वाढण्याची शक्यता आहे. निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीने मागील आर्थिक वर्षी 252.92 टक्के अधिक महसुल वाढ नोंदवली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nirman Agri Genetics Share Price today on 23 September 2023.

हॅशटॅग्स

SME Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x