17 May 2024 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
x

Penny Stocks | आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स शेअरने एका दिवसात 18 टक्के परतावा दिला, आजही अप्पर सर्किटवर, भरघोस कमाई करणार?

Penny Stocks

Penny Stocks | आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. सोमवारी सुरुवातीच्या काही तासात आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढीसह 58.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीच्या शेअरमध्ये इतकी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीने एक मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.04 टक्के वाढीसह 54.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ऑर्डर तपशील
आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीने आपल्या स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला NHAI ने एक मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार, आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला NHDP अंतर्गत उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश राज्यात काशीपूर-सितारगंज विभाग NH-74 च्या 175 ते 252.200 किमी महामार्गाचे चौपदरीकरण ऑपरेशन आणि देखभाल संबंधित कामासाठी DBFOT आधारावर सेवा प्रदान करायची आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मुल्य 5.07 कोटी रुपये आहे.

शेअरची कामगिरी
आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने मोठी ऑर्डर दिल्याने कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 49.24 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर सोमवारी या कंपनीचे शेअर्स 58.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39.07 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 30.16 रुपये होती.

कंपनीबद्दल थोडक्यात
आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनी मुख्यतः महामार्ग आणि विमानतळ या पायाभूत सुविधा तसेच शहरी विकास प्रकल्पांचे व्यवस्थापन संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीमध्ये 39 टक्के भाग भांडवल प्रवर्तकांनी धारण केले आहे. आणि 60 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहे आणि उर्वरित भाग भांडवल FII ने होल्ड केले आहे.

मागील आर्थिक वर्षात कंपनीच्या शेअरची कामगिरी फारशी चांगली नव्हती. मात्र मागील काही वर्षांमध्ये मार्जिनच्या रूपात कंपनीने नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट्स कंपनीचा महसूल 23 टक्के कमी नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Artefact Projects share price 26 September 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(469)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x