20 May 2024 2:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Mufin Green Share Price | कमाल झाली! मुफिन ग्रीन फायनान्स शेअरने एका दिवसात 9.99% परतावा दिला, लवकरच मल्टिबॅगर परतावा?

Mufin Green Share Price

Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 2077 टक्के परतावा कमावून दिला आहे. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, 28 सप्टेंबर 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीचे अधिकृत भाग भांडवल 20 कोटींवरून वाढवून 50 कोटी रुपये करण्यास मान्यता दिली आहे.

मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळाने 2.55 कोटी रुपये मूल्याचे परिवर्तनीय वॉरंट जारी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे वॉरंट 18 महिन्यांसाठी प्रति शेअर 55 रुपये किमतीवर जारी केले जाणार आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स स्टॉक 9.99 टक्के वाढीसह 83.34 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीने कन्व्हर्टेबल वॉरंटद्वारे भांडवल उभारण्याची तयारी केली आहे. ही कंपनी 2.55 कोटी वॉरंट जारी करून 140 कोटी 25 लाख रुपये भांडवल उभारणी करणार आहे. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक कपिल गर्ग हे परिवर्तनीय वॉरंट जारी करणार आहे. प्रेफरेंशियल इश्यूद्वारे जारी करण्यात येणारे परिवर्तनीय वॉरंटद्वारे भांडवल उभारणी केले जाणार आहे.

मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीची एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनी संचालक मंडळच्या बैठकीत 15 ऑक्टोबर 2023 ही कट ऑफ तारीख निश्चित करण्यात आली होती, ज्यात सर्वसाधारण सभेच्या वेळापत्रकासाठी दूरस्थ ई-मतदान करण्याचे नियोजन केले जाणार आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 4.25 टक्क्यांच्या वाढीसह 79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे बाजार भांडवल 1019 कोटी रुपये आहे. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 111 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 226 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2077 टक्के नफा कमावून दिला आहे.

मुफिन ग्रीन फायनान्स ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करणारी कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्या लोकांना 350 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. या कंपनीच्या मते, ev वाहनांच्या वापरामुळे 1.73 लाख टन कार्बन उत्सर्जन प्रमाण कमी होणार आहे. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीने 354 दशलक्ष ग्रीन किलोमीटर लांबी कव्हर केली असून 49 कोटी रुपये मूल्याची ईव्ही मालमत्ता भाडे तत्वावर दिली आहे.

मफिन ग्रीन फायनान्स ही कंपनी एक आघाडीची NBFC कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज वाटप करते. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनी अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना ई-स्कूटी, ई-रिक्षा इत्यादी खरेदी करण्यासाठी कर्ज पुरावठा करते.

यासोबतच ही कंपनी इलेक्ट्रिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि बॅटरी स्वॅपिंग संबंधित क्षेत्रात देखील व्यवसाय करत आहे. मुफिन ग्रीन फायनान्स ही कंपनी आपल्या ग्राहकांना चॅनल फायनान्ससह इलेक्ट्रिक टू व्हीलर, इलेक्ट्रिक रिक्षा, इलेक्ट्रिक तीन चाकी आणि इलेक्ट्रिक फोर व्हीलरच्या b2b फायनान्सिंग संबंधित सेवा देखील प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mufin Green Share Price 30 September 2023.

हॅशटॅग्स

Mufin Green Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x