19 May 2024 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये
x

Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO वर लक्ष ठेवा, टाटा मोटर्सने घेतला मोठा निर्णय, मोठी डील झाली, IPO गुंतवणूक श्रीमंत करेल

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीमधील 9.9 टक्के भाग भांडवल विकले आहे. ही डील एकूण 1,613.7 कोटी रुपयेवर झाली आहे. टाटा मोटर्स कंपनीने हे भाग भांडवल 16,300 कोटी म्हणजेच 2 अब्ज डॉलर्स बाजार मूल्यावर विकले आहे.

TPG Rise Climate कंपनीने टाटा मोटर्सकडून टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे 9.9 टक्के भाग भाग भांडवल खरेदी करून ही गुंतवणूक केली आहे. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा आयपीओ लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. आज सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.00 टक्के वाढीसह 673.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा मोटर्स कंपनीने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टीपीजी राइज क्लायमेट फर्मने यापूर्वी देखील टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीमध्ये 1 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. आणि भारतीय वाहन उत्पादन बाजारपेठेत इलेक्ट्रिक पॅसेंजर मोबिलिटी व्यवसाय तयार करण्याच्या व्यवसायात टाटा मोटर्स कंपनीच्या प्रवासात टीपीजी राइज क्लायमेट फर्म एक धोरणात्मक भागीदार म्हणून काम करत आहे.

टाटा मोटर्स कंपनीने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टीपीजी राइज क्लायमेट फर्मसोबतचा हा व्यवहार 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. टाटा मोटर्स कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीमधील आपले 9 टक्के भाग भांडवल TPG राइज क्लायमेट फर्मला विकून 1,467 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. तर टाटा मोटर्स कंपनी आपले 0.9 टक्के भाग भांडवल रतन टाटा एन्डॉमेंट फाऊंडेशनला विकून 146.7 कोटी रुपये जमा करणार आहे.

31 मार्च 2023 पर्यंत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची कमाई 4,414 कोटी रुपये होती. तर कंपनीची निव्वळ मालमत्ता 2,989 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 667.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा मोटर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,21,648.38 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO GMP 16 October 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x