19 May 2024 8:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Newgen Soft Share Price | मल्टिबॅगर शेअर! ऑर्डर्सचा भडिमार पाहून न्यूजेन सॉफ्टवेअर शेअरची तुफान खरेदी, पुढेही मल्टिबॅगर परतावा?

Newgen Soft Share Price

Newgen Soft Share Price | न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर आपल्या गुंतवणूकदारांना अल्प आणि मध्यम मुदतीत मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतात. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये न्यू जेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के वाढीसह 925 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6490 कोटी रुपये आहे.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 999.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 299.95 रुपये होती. मागील एका महिन्यात न्यूजेन सॉफ्टवेअर स्टॉकची किंमत 8.5 टक्के वाढली आहे. आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी न्यू जेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी स्टॉक 8.16 टक्के वाढीसह 1,126.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गेल्या 6 महिन्यांत न्यू जेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. न्यूजेन सॉफ्टवेअर टेक लिमिटेड कंपनीला 68 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. न्यू जेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीला डिजिटल बिझनेस प्लॅटफॉर्मचा विकास, अंमलबजावणी, व्यवस्थापन आणि देखभाल यासाठी 5 वर्षांच्या मुदतीची ऑर्डर प्राप्त झाली आहे.

यापूर्वी न्यू जेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीला कस्टमर हब पोर्टल आणि सप्लाय चेन फायनान्स सोल्यूशन कडून एंड टू एंड ट्रेड फायनान्स अंमलबजावणीची ऑर्डर देण्यात आली होती. या ऑर्डरचे एकूण मूल्य 43 कोटी रुपये होते.

2020 मध्ये न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 102 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. 17 जून 2023 रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 340 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आतापर्यंत गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून 200 टक्के नफा कमावला आहे. न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी ही एक ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे उत्पादन डिझाइनिंग आणि एंड टू एंड सॉफ्टवेअर सोल्यूशन्स जगभरात अतिशय लोकप्रिय मानले जातात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Newgen Soft Share Price NSE October 2023.

हॅशटॅग्स

Newgen Soft Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x