17 May 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
x

Zomato Vs Paytm Share | झोमॅटो आणि पेटीएम शेअर फायद्याचा? तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी कोणत्या शेअरचा सल्ला दिला

Zomato Vs Paytm Share

Zomato Vs Paytm Share | झोमॅटो आणि पेटीएम कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी फारसा उत्साही प्रतिसाद दिला नव्हता. आणि त्यानंतर या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाला बळी पडले होते. मात्र आता अलीकडच्या काही तिमाहीपासून या कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा, महसुलात वाढ आणि खर्चात घट पाहायला मिळत आहे.

सध्या जे तुम्ही दीर्घ मुदतीसाठी शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही झोमॅटो आणि पेटीएम स्टॉक खरेदी करू शकता. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी झोमॅटो स्टॉक 0.94 टक्के घसरणीसह 105.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर पेटीएम स्टॉक 2.86 टक्के वाढीसह 901 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर पेटीएम कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 38 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 76 टक्के परतावा कमावून दिला आहे.

पेटीएम कंपनीच्या शेअरने या वर्षी लोकांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 75.37 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर 2023 दरम्यान झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 109 टक्के नफा कमावून दिला आहे. तर जानेवारी आणि मार्च 2023 मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये अनुक्रमे 16.10 आणि 4.67 टक्के घट पाहायला मिळाली होती. पेटीएम कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 2 टक्के नफा कमावून दिला आहे.

ऑगस्ट 2023 पासून सलग तिसऱ्या महिन्यात या कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ पाहायला मिळत आहे. जुलै 2023 मध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 7.7 टक्के आणि जानेवारी 2023 मध्ये 0.2 टक्क्यांनी कमजोर झाले होते. तर फेब्रुवारी 2023 ते जून 2023 दरम्यान सलग 5 महिने या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. काळात हा स्टॉक कालावधीत 63 टक्क्यांनी वाढला आहे.

झोमॅटो कंपनीचे शेअर्स 16 नोव्हेंबर 2021 रोजी 169 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत हा स्टॉक 37 टक्के खाली ट्रेड करत आहे. 18 ऑक्टोबर 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 115.10 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक 105 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 27 जुलै 2022 रोजी झोमॅटो स्टॉक 40.60 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 162 टक्क्यांनी वाढला आहे.

पेटीएम स्टॉक 18 नोव्हेंबर 2021 रोजी 1,955 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीपासून शेअर्स 55 टक्क्यांनी कमजोर आहे. मागील आठवड्यात 20 ऑक्टोबर 2023 रोजी पेटीएम स्टॉक 998.30 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. 23 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम स्टॉक 438.35 रुपये या विक्रमी नीचांक किमतीवरून 100 टक्के वाढले आहे.

जून 2023 तिमाहीत झोमॅटो कंपनीने प्रथमच 2 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 186 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता. तर दुसरीकडे, पेटीएम कंपनीला Q2FY24 मध्ये 292 कोटी रुपये एकत्रित निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. तथापि या कंपनीचा निव्वळ तोटा मागील वर्षीच्या 1,914 कोटी रुपयेवरून 49 टक्क्यांनी घटला आहे.

झोमॅटो कंपनीने काही महिन्यांपूर्वी ब्लिंकिट कंपनीचे अधिग्रहण केले होते. तर पेटीएम कंपनीला Google Pay, PhonePe आणि विविध बँका कडून कठोर स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि बजाज फायनान्स पेमेंट कंपनीने फिन टेक सेवांमध्ये प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत पेटीएम कंपनीचे मार्केट शेअर कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Vs Paytm Share NSE 27 October 2023.

हॅशटॅग्स

Zomato Vs Paytm Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x