17 May 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा
x

Multibagger Stocks | होय! दर 3 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतोय हा शेअर, फायद्याच्या शेअरची कामगिरी नोट करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धामुळे जगात महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे आर्थिक मंदीचे संकेत मिळत आहेत. अशा मंदीच्या काळात सहाना सिस्टीम या आयटी कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. Sahana Systems Share Price

मागील तीन दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सहाना सिस्टीम कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 332.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सहाना सिस्टीम स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 349.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सहाना सिस्टीम कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणेज, कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर हा आयटी स्टॉक जबरदस्त तेजीत आला आहे. सहाना सिस्टम कंपनीने एप्रिल ते सप्टेंबर 2022 या तिमाहीत 22.13 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

सहा वर्षापूर्वी सहाना सिस्टीम कंपनीचे महसूल संकलन फक्त 7.2 कोटी रुपये नोंदवले गेले होते. सध्याच्या तिमाहीत सहाना सिस्टम कंपनीचा PAT 5.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या कंपनीचा PAT 1.8 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

मागील 3 महिन्यांत सहाना सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील 3 महिन्यांत सहाना सिस्टीम कंपनीच्या शेअरची किंमत 131 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. तर मागील 6 महिन्यांत सहाना सिस्टीम स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 146.5 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment 27 October 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x