19 May 2024 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

IRFC Vs Railtel Share Price | IRFC की रेलटेल शेअर फायद्याचा? कोणता शेअर देतोय अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा? फायद्या शेअर कोणता पहा

IRFC Vs Railtel Share Price

IRFC Vs Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या मिनीरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअरने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आता रेलटेल कंपनी आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करणार आहे.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या शेअर धारकांना 10 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर 1.29 टक्के घसरणीसह 221.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने आपले जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने 68 कोटी रुपये निव्वळ नफा कामवला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करणार आहे.

कंपनीने लाभांश वाटप करण्यासाठी 4 नोव्हेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य दहा रुपये आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना शेअर्सच्या दर्शनी मूल्यावर दहा टक्के लाभांश वाटप करणार आहे.

रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीने जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीत 68 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने 55 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2023 तिमाहीत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने 599 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत या कंपनीने 429 कोरी रुपये महसूल संकलित केला होता. मागील सहा महिन्यांत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदरांचे पैसे दुप्पट केले आहेत.

27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 114.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात हा स्टॉक 97.11 टक्के वाढून 225.30 रुपये किमतीवर पोहचला होता. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 76.60 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात रेलटेल कंपनीच्या शेअरची किंमत 95.48 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पत्की किंमत 255.40 रुपये होती. तर नीचांकी पटली किंमत 96.25 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs Railtel Share Price NSE 30 October 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs Railtel Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x