19 May 2024 7:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स खरेदी करावे का? तज्ज्ञांकडून शेअरची नवी टार्गेट प्राईस जाहीर, किती झाली टार्गेट प्राईस?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने मागील आठवड्यात शनिवारी माहिती दिली की, येस बँकेने मालमत्ता पुनर्रचना कंपनी जेसी फ्लॉवर ARC कंपनीमधील आपला गुंतवणूक वाटा 9.9 टक्केपर्यंत वाढवला आहे.

येस बँकेने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, जेसी फ्लॉवर्स कंपनीने 27 ऑक्टोबर 2023 रोजी 2.4 कोटी शेअर्स येस बँकेला हस्तांतरित केले आहेत. यामुळे येस बँकेंचा वाटा आता 9.9 टक्केवर पोहचला आहे. आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 0.94 टक्के वाढीसह 16.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

येस बँकेने मागील वर्षी 28 नोव्हेंबर 2022 रोजी जेसी फ्लॉवर्स कंपनीमध्ये गुंतवणूक करून 9.9 टक्के इक्विटी स्टेक धारण केला होता. मात्र नंतर त्यातील काही वाटा विकून आपला हिस्सा 5.01 टक्क्यांवर आणला. आता पुन्हा येस बँकेने अतिरिक्त शेअर्स खरेदी करून आपला वाटा पूर्वीच्या पातळीवर आणला आहे. जेसी फ्लॉवर्स ही मालमत्ता पुनर्रचना कंपनी म्हणून मे 2015 मध्ये स्थापन झाली होती.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 15.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स किंचित प्रमाणात तेजीत वाढत आहेत. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने येस बँकेच्या शेअर्सची लक्ष किंमत कमी केली आहे. तज्ञांच्या मते येस बँकेचे शेअर्स 14 रुपयेपर्यंत घसरू शकतात. येस बँकेचे शेअर्स 23 ऑक्टोबर 2023 रोजी 14.10 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE 31 October 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x