19 May 2024 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

Suzlon Share Price | स्वस्तात मस्त! सुझलॉन एनर्जी शेअर्सची अप्पर सर्किट मालिका सुरु, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती असेल?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 34.44 रुपये या नऊ वर्षांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत, त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. सप्टेंबर 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने PAT मध्ये 82 टक्के वाढ नोंदवली आहे. मुख्यतः खर्चात घट झाल्याने कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 102 कोटी नफा कमावला आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 34.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

सुझलॉन एनर्जी कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीत 56 कोटी रुपये PAT नोंदवला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीने मजबूत निकाल जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आहे. 23 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने 34.10 रुपये या उच्चांक पातळी किमतीला पार केले आहे. तर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6.96 रुपये होती.

2023-24 या आर्थिक वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे बाजार मूल्य 335 टक्के मजबूत झाले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 1417 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1430 कोटी रुपये महसूल कमावला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीने चांगल्या मार्जिनमुळे उच्च EBITDA नोंदवला आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनी ऑगस्ट 2023 मध्ये पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. म्हणून कंपनीच्या खर्चात वर्ष-दर-वर्ष आधारे 61 टक्के घट झाली आहे. दरम्यान, सप्टेंबर 2023 मध्ये क्रिसिल रेटिंग्स एजन्सीने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला होता.

रेटिंग एजन्सी क्रिसिलने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, कंपनीच्या विंड टर्बाइन व्यवसाय प्रोफाइलमध्ये वाढ झाली आहे. मागील दोन-तीन वर्षांमध्ये कंपनीने कॉस्ट ऑप्टिमायझेशन आणि तर्कशुद्धीकरणाचे अनेक प्रयत्न केले आहेत, ज्याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या निकालात पाहायला मिळत आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचा EBITDA 750 कोटी रुपयेवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 04 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x