17 May 2024 4:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Trident Share Price | भरवशाचा 37 रुपयाचा ट्रायडेंट शेअर संयमातून करेल श्रीमंत, योग्यवेळी एंट्री घेऊन फायदा घेणार?

Trident Share Price

Trident Share Price | ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.49 टक्क्यांच्या वाढीसह 38.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19300 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 43.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 25.05 रुपये होती.

मागील 6 महिन्यांत ट्रायडेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 38.40 रुपये परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.06 टक्के घसरणीसह 37.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

27 मार्च 2023 रोजी ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 25 रुपये या आपल्या नीचांक किमतीच्या तुलनेत 50 टक्के वाढले आहेत. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर या किमतीच्या तुलनेत ट्रायडेंट लिमिटेड स्टॉक 10 पट अधिक वाढला आहे.

ट्रायडेंट लिमिटेड कंपनीने सेबी कळवले की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 90.31 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 141 टक्क्यांची वाढ झाली आहे. ट्रायडेंट लिमिटेड कंपनीने सप्टेंबर तिमाहीत 25 टक्के वाढीसह 1797 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

14 जुलै 1995 रोजी ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 75 पैशांवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या किमतीवरून हा स्टॉक आता 4800 टक्के वाढला आहे. नुकताच ट्रायडेंट लिमिटेड कंपनीने मध्य प्रदेशातील बुधनी येथे 9.5 मेगावॉट क्षमतेचा नवीन रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प बुधनी येथील कंपनीच्या उत्पादन केंद्राला वीज पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आला आहे. कंपनीने हरित ऊर्जेचा वापर करून कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्रायडेंट लिमिटेड कंपनीने आपल्या रासायनिक व्यवसायाच्या व्यावसायिक ऑपरेशनसाठी 100 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. ट्रायडेंट लिमिटेड ही कंपनी मुख्यतः कापड, कागद, सूत आणि रासायनिक उत्पादन करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी टॉवेल, प्रिंटिंग पेपर, विणकाम आणि होजियरी यार्न आणि सल्फ्यूरिक ऍसिडमध्ये संबंधित व्यवसाय करते. ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचा लाभांश प्रमाण 41.3 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Trident Share Price NSE 17 November 2023.

हॅशटॅग्स

#Trident Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x