17 May 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Bonus Shares | फुकट शेअर्स हवे आहेत का? मग रेकॉर्ड तारिखपूर्वी हा शेअर खरेदी करा, मिळतील फ्री बोनस शेअर्स

Bonus Shares

Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अल्फ़ालॉजिक टेकसिस कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 3 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.

बोनस शेअरच्या बातमीमुळे अल्फ़ालॉजिक टेकसिस कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अल्फ़ालॉजिक टेकसिस कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी अल्फ़ालॉजिक टेकसिस कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 76.84 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अल्फ़ालॉजिक टेकसिस कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 3 शेअर्सवर 1 शेअर बोनस वाटप करण्याची घोषणा केली होती. 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीने आपल्या 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 3 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे.

मात्र कंपनीने अद्याप बोनस शेअरची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 73.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यापूर्वी 2021 मध्ये कंपनीने प्रत्येक 10 शेअर्सवर 27 बोनस शेअर्स वाटप केले होते.

अल्फ़ालॉजिक टेकसिस कंपनीने 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स वाटप केले होते. मागील एका वर्षभरात अल्फ़ालॉजिक टेकसिस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 88 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 1000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares for investment 17 November 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x