18 May 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीची ऑर्डरबुक मजबूत, शेअर्समधून मिळतोय तुफान वेगात परतावा

Olectra Share Price

Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 497 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आता या कंपनीचे शेअर्स 1200 रुपयेच्या पार गेले आहेत. जून 2023 मध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने 1465 रुपये किंमत स्पर्श केली होती. आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 5.21 टक्के वाढीसह 1,258.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला 900 इलेक्ट्रिक बस बनवण्याचे कंत्राट मिळाले होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी मानली जाते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 550 बस बनवण्याची ऑर्डर दिली आहे. तर महाराष्ट्र बेस्टने देखील ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला 2150 बसची ऑर्डर दिली आहे. आणि महाराष्ट्र राज्य महामंडळाने ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला 5150 बस बनवण्याची ऑर्डर दिली आहे.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीकडे सध्या 9000 बसची ऑर्डर आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 12 ते 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. ब्रोकरेज हाऊस जिओजित फायनान्शिअलने म्हंटले आहे की, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी पीएम ई-बस कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत करत आहे. या योजनेच्या माध्यमातुन भारत सरकार 10,000 इलेक्ट्रिक बस चालवण्याची योजना आखत आहे.

पुढील महिन्यापासून या संबंधित निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने EV बस सेगमेंटमध्ये 27 टक्के मार्केट काबीज केला आहे. तज्ञांच्या मते मजबूत बुक ऑर्डरमुळे या कंपनीचे शेअर्स 1351 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Olectra Share Price today on 20 November 2023

हॅशटॅग्स

Olectra Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x