16 May 2024 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Bonus Shares | फ्री शेअर्स मिळणार? एसबीसी एक्सपोर्ट कंपनी फ्री बोनस शेअर्स जाहीर करू शकते, वेळीच फायदा घ्यावा का?

Bonus Shares

Bonus Shares | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यां आपल्या गुंतवणुकदारांना विविध माध्यमातून फायदा देत असतात. अशीच कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीचे नाव आहे ‘एसबीसी एक्सपोर्ट’.

या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या शेअरधारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची तयारी करत आहे. आज मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी एसबीसी एक्सपोर्ट स्टॉक 2.72 टक्के वाढीसह 30.20 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

एसबीसी एक्सपोर्ट कंपनीची स्थापना 1991 साली झाली होती. 1991 साली गणेश प्रसाद गुप्ता यांनी एसबीसी एक्सपोर्ट कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी कापड संबंधित व्यवसाय करते. एसबीसी एक्सपोर्ट कंपनी टी-शर्ट, डेनिम स्वेट शर्ट्स बनवण्याचे काम करते.

एसबीसी एक्सपोर्ट कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 5 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2023 दरम्यान एसबीसी एक्सपोर्ट स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के नफा कमावून दिला आहे.

एसबीसी एक्सपोर्ट कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 65.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. जून तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीच्या प्रवर्तकांच्या भाग भांडवालाचे प्रमाण कमी होऊन 65.81 टक्केवर आले आहे. जून 2023 तिमाहीत या कंपनीचे प्लेज शेअर्सचे प्रमाण 17.78 टक्के होते. जे सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत 15.5 टक्क्यांवर आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares for investment 21 November 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x