16 May 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये लक्षणीय तेजी, गुंतवणुकदारांसाठी आनंदी बातमी, शेअर प्राईस किती वाढणार?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. मात्र आज शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत आज शेअर बाजारात बँकिंग स्टॉक तेजीत वाढत आहेत. मंगळवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 3.77 टक्के वाढीसह 22.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

येस बँकेच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, येस बँकेने नुकताच 4,234 कोटी रुपये मूल्याच्या NPA विक्रीसाठी निविदा मागवल्या आहेत. यामध्ये, 31 ऑक्टोबर 2023 पर्यंतचा निधी आधारित थकबाकी 3,073.66 कोटी रुपये आणि बिगर निधी आधारित थकबाकी 17.83 कोटी रुपये असेल. येस बँकेचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 21.33 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर काही तासात शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअरची किंमत 20.90 रुपये किमतीवर आली होती.

येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 24.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.40 रुपये होती. मागील 6 महिन्यांत येस बँक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात येस बँक स्टॉकने फारसा परतावा दिला नाहीये.

येस बँक स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर 21 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, जर येस बँक स्टॉक 29 रुपये किमतीपर्यंत गेला तर शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात उसळी पाहायला मिळू शकते. तज्ञांच्या मते दीर्घकालीन संयम राखल्यास, पुढील 4-5 वर्षात या बँकेचे शेअर्स 100 रुपये किंमत स्पर्श करतील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE 14 December 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x