19 May 2024 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका
x

Texmaco Rail Share Price | मागील 6 महिन्यांत 180 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करणार? ऑर्डरबुक मजबूत, पुढे फायदा होईल

Texmaco Rail Share Price

Texmaco Rail Share Price | टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 188.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी एक ऑर्डर मिळाल्यामुळे निर्माण झाली होती. टेक्समॅको रेल कंपनीला भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून 1374.41 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 40.49 रुपये होती. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग स्टॉक 3.43 टक्के वाढीसह 176.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली की, भारतीय रेल्वे मंत्रालयाने टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीला 3400 BOXNS वॅगन बनवण्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 1374.41 कोटी रुपये आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये एसएस फॅब्रिकेटर्स आणि मॅन्युफॅक्चरर्ससह टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला 179.89 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर प्राप्त झाल्या होत्या. ही ऑर्डर SJVN अरुण-3 पॉवर डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडने दिली होती. दरम्यान टेक्समॅको रेल कंपनीने नोव्हेंबर 2023 मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनलच्या माध्यमातून 744 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. आणि या कंपनीला आणखी 20000 वॅगन बनवण्याची ऑर्डर मिळणे अपेक्षित आहे.

टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीला सरकारी आणि खाजगी ग्राहकाकडून 20,000 वॅगन बनवण्याची ऑर्डर मिळणे अपेक्षित आहे. टेक्समँको रेल कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 57.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 188.95 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 6 महिन्यांत टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 180 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 65.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Texmaco Rail Share Price NSE 16 December 2023.

हॅशटॅग्स

Texmaco Rail Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x