19 May 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पोलादी ताकद दाखवतोय, पुढे मजबूत तेजी, तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस जाहीर केली

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या अनेक गुंतवणूक सल्लागार टाटा स्टील स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. काही तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 150 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 4.21 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.10 टक्के वाढीसह 133.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारी BSE निर्देशांकातील 30 शेअरपैकी फक्त टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे शेअर्स सर्वात जास्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. बुधवारी टाटा स्टील स्टॉक बीएसई इंडेक्सवर 135.40 रुपये या आपल्या आधीच्या क्लोजिंग किमतीच्या तुलनेत 4.21 टक्के घसरणीसह 129.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर NSE इंडेक्सवर टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के घसरणीसह 128.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

26 डिसेंबर 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 101.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 18 डिसेंबर 2023 रोजी टाटा स्टील स्टॉक 137.65 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. ब्रोकरेज जेफरीजने टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकवर 160 रुपये टारगेट प्राइस निश्चित करून स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे.

जागतिक बाजारात स्टीलच्या किमती मार्च-ऑक्टोबर 2023 या काळात 22 टक्क्यांनी घसरल्या होत्या. मात्र नंतर अवघ्या दोन महिन्यांत स्टीलची किंमत 8 टक्क्यांनी वाढली. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सबाबत जेफरीज फर्मला विश्वास आहे की, टाटा स्टील कंपनीच्या मालमत्तेत होणारी सुधारणा आणि स्टील उद्योगात कंपनीचा वाढणारा वाटा सकारात्मक संकेत देत आहे.

सध्या टाटा स्टील स्टॉक मजबूत ब्रेकआउटसह अपट्रेंडमध्ये ट्रेड करत आहे. सध्या टाटा स्टील स्टॉक मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे. टाटा स्टीलमध्ये गुंतवणुकदारांना लोकांनी 135.40 रुपये किमतीच्या आसपास पोझिशन घ्यावी आणि 145 रुपये या पहिल्या टार्गेटसाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE 22 December 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x